![]()
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून भक्तांच्या होणाऱ्या गर्दीकरिता केलेल्या उपाययोजना ह्या उल्लेखनीय व्यवस्थेमुळे भक्तातून समाधान व्यक्त होत असून, यामध्ये सुसज्ज वाहनतळ, महाप्रसाद रांग, भक्तांना राहण्याची उत्तम सुविधा, ऑनलाईन महाप्रसाद सेवा या
.
१ मे महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, अंगारक चतुर्थी, वैशाख अपरा एकादशी, ज्येष्ठ शुध्द कमला एकादशी, अमावस्या, अधिक मास, गुरुपुष्यामृत, अधिक मास पोर्णिमा, उन्हाळी सलग सुट्यांमुळे दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी होत आहे. पहाटे पाच वाजल्यापासूनच मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे अन्नछत्र व मंदिर परिसर गजबजून गेले. दुपारी ऊन वाढत असल्यामुळे स्वामी भक्त सकाळी सकाळी मंदिरात दर्शनासाठी व अन्नछत्र मंडळात गर्दी करत आहेत. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील दर्शनानंतर भाविकांनी अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी गर्दी केली होती. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून भक्तांच्या सेवेर्थ विविध उपाययोजना करण्यात आल्याने भक्तातून समाधान व्यक्त होत आहे.
वटवृक्ष देवस्थानात दर्शनानंतर भाविकांची पावले थेट अन्नछत्रात