हिंगोलीत अत्यावश्यक सेवांसाठी डिझेल पुरवठ्याचे आदेश:नियम मोडल्यास पेट्रोल पंपांवर होणार फौजदारी कारवाई
जिल्ह्यातील शासकीय कामकाज आणि अत्यावश्यक सेवा विस्कळीत होऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शासकीय कामांसाठी आणि अत्यावश्यक सेवांसाठी अधिकृत वाहने तसेच काही खाजगी संस्थांना डिझेल पुरवठा करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप धारकांना दिले आहेत. जिल्हा परिषद हिंगोलीचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, 136 इन्क. बटालियन, टाटा…