Headlines

वेध गणेशोत्सवाचे:पीओपी, मजुरी वाढीने गणेशमूर्तींचे दर 30% महागणार




यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक खर्च करावा लागणार आहे. पीओपी, रंग, सजावटीचे साहित्य आणि कारागिरांच्या मजुरीत झालेल्या वाढीमुळे गणेशमूर्तींच्या किमती सरासरी २५ ते ३० टक्क्यांनी वाढणार आहेत. अकोल्यातील मूर्तीकारांनी गणेशमूर्ती तयार करण्याचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण केले असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून रंगकामाला वेग येणार आहे. यंदा पीओपीच्या दरवाढीमुळे मुर्तींच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २० किलो वजनाची पीओपीची बॅग सुमारे १९० रुपयांना मिळत होती. यंदा त्याच बॅगची किंमत २५० रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय कारागिरांची कमतरता आणि वाढलेले मजुरीचे दर यामुळेही मूर्तिकारांना रेट वाढवावे लागत आहेत. सोबतच मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे रंग, ब्रश, फायबर, साचे, पॅकिंग साहित्य आणि वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. साचे तयार करणे, पीओपी भरणे, मूर्ती वाळवणे आणि फिनिशिंग अशी प्रक्रिया सुरू आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून रंगकाम आणि सजावटीचे काम वेगाने सुरू होईल. उंची २०२५ २०२६ ४ फूट ५००० ७००० ५ फूट ७,००० १०,००० ६ फूट ८,००० ११,००० ७ फूट ९,००० १३,००० दरवाढीची तीन कारणे यंदा गणेशमूर्ती महागण्यामागे पीओपीचे वाढीव दरच कारणीभूत नाही. उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर खर्च वाढला आहे. पीओपीचे रेट वाढले : २० किलोची बॅग १९० रुपयांवरून २५० रुपयांवर. मजुरी दुप्पट : कारागिरांची मजुरी ३५० ते ४०० रुपयांवरून ७०० रुपयांपर्यंत वाढली. इतर साहित्य महागले : रंग, ब्रश, वार्निश, पॅकिंग, वाहतूक खर्चात वाढ. उत्पादन खर्चात वाढ ^पीओपीचे दर, मजुरी आणि इतर साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे यंदा मूर्तींच्या किमतीत सरासरी २५ ते ३० टक्के वाढ करावी लागत आहे. गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता मुर्ती घडवण्याचे काम सुरू असून ६० टक्के काम झाले आहे. – आशिष रोकडे, गणेशमूर्ती व्यावसायिक. गणेशमूर्ती का महागणार? गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सर्वप्रथम साच्यामध्ये पीओपी भरले जाते. त्यानंतर मूर्ती वाळवून फिनिशिंग केली जाते. पुढे रंगकाम, डेकोरेशन, वार्निश, पॅकिंग अशी प्रक्रिया असते. या प्रत्येक टप्प्यावर लागणाऱ्या साहित्याच्या आणि मजुरीच्या दरात यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून मूर्तींच्या विक्री दरात २५ ते ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *