Headlines

एस-14 संवर्गामुळे नुकसान नाही; सांगली येथील बैठकीमध्ये ग्वाही:जिल्हा परिषदेत आता वरिष्ठ, कनिष्ठ लिपिक ऐवजी एकच संवर्ग‎



जिल्हा परिषदेतील कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी ही पदे एस-१४ या संवर्गात एकत्र होणार असल्याची ग्वाही म. रा. जिल्हा परिषद लिपीक संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी दिली. लिपीक संघटनेची राज्यस्तरीय संवाद बैठक सांगली येथे पार पडली. या बैठकीस राज्यात

.

या प्रसंगी बोलताना राज्याचे कार्याध्यक्ष तथा अमरावतीचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी स्पष्ट केले की, दोन पदे एकत्र केल्यामुळे एस-१३ ऐवजी एस-१४ मध्ये सुधारित वेतननिश्चिती करताना कर्मचाऱ्याचे वेतन कमी झाल्यास पुढील टप्प्यात वेतन निश्चिती करण्याचे स्पष्ट शासन निर्देश आहेत. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे लिपीकांच्या वेतनत्रुटी, ग्रेड वेतन वाढ आणि पदोन्नतीचे टप्पे कमी करण्याच्या निर्णयापर्यंत झालेला प्रवास राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी उपस्थितांसमोर मांडला. तसेच येत्या एक-दोन महिन्यांत सांगली येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले जाणार असल्याची माहितीसुद्धा सूर्यवंशी यांनी दिली. कार्यक्रमात ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्ती झाल्याबद्दल सांगली जिल्हाध्यक्ष विशाल पाटील यांचा, तसेच विविध पतसंस्थांवर चेअरमनपदी निवड झालेल्या लिपीकांचा आणि नवनियुक्त नांदेड जिल्हाध्यक्षांचा विशेष सत्कार करण्यात आला.

राज्य सचिव अरुण जोर्वेकर व राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर लिपीकांनी विचारलेल्या प्रश्नांना राज्याध्यक्षांनी समर्पक उत्तरे दिली. बैठकीचे प्रास्ताविक सांगली जिल्हाध्यक्ष विशाल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सहसचिव सायली कुलकर्णी व जिल्हा समन्वयक अशोक लोहार यांनी केले, राज्य संघटक ओंकार वंजारी यांनी आभार मानले.

कुळकर्णी यांना देणार मरणोत्तर जीवनगौरव दोन पदे एकत्र करण्याचा निर्णय घेणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, तसेच शासन स्तरावर मदत करणारे आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर यांचा नागरी सत्कार केला जाणार. लिपीकांच्या प्रश्नांसाठी नेतृत्व करणारे दिवंगत बापूसाहेब कुलकर्णी यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्याची घोषणा यावेळी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *