Headlines

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा:महावितरणचे एकतर्फी वर्चस्व; 4 सांघिक विजेतेपद पटकावले, कबड्डीमध्ये 15 वर्षांनी उधळला यशाचा गुलाल

एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या वतीने आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 47 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महिला पुरुष गटातील कबड्डी व खो-खो तसेच कुस्तीमध्ये महावितरणने तब्बल चार सांघिक विजेतेपद व एक उपविजेतेपद मिळवत एकतर्फी वर्चस्व राखले. बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशभरातली विद्युत कंपन्यांच्या तीन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेचा शुक्रवारी सायंकाळी समारोप झाला. दरम्यान, महावितरणच्या…

Read More

TCS धर्मांतर प्रकरणावरून राजकारण तापले:धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप

नाशिकच्या टीसीएस (TCS) कंपनीतील कथित अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाला तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएम (MIM) नगरसेवकावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेना आक्रमक झाली असतानाच, काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाला ‘भाजपचा राजकीय डाव’ संबोधले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेली निदा…

Read More

जालन्यात गुणरत्न सदवार्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून शाईफेक:सुपाऱ्याही फेकल्या; राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली आहे. यावेळी शाईफेकीसोबत सुपाऱ्या देखील फेकण्यात आल्या आहेत. ही घटना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात घडली आहे. सदावर्ते यांनी काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याच्या निषेधार्थ मनसैनिकांकडून सदवार्ते यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते…

Read More

ज्येष्ठ कार्यकर्त्या शांताबाई साठे काळाच्या पडद्याआड:अण्णाभाऊंच्या कन्या आणि विचारांचा अखेरचा स्वाभिमानी आवाज हरपला

लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या आणि कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉम्रेड शांताबाई साठे (दोडके) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कांदिवली येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणारा एक महत्त्वाचा दुवा तुटल्याची भावना सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. शांताबाई अविवाहित होत्या….

Read More

TCS प्रकरणाला MIM पक्षाशी जोडणे चुकीचे:निदा खानची निर्दोष मुक्तता होईल, आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करावेत – असदुद्दीन ओवैसी

नाशिकच्या कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर निर्माण झालेल्या वादावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणातील कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवले आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. TCS प्रकरणाला MIM पक्षाशी जोडणे चुकीचे आहे. आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करावेत, असे…

Read More

शुभेंदू अधिकारींच्या शपथविधीवेळी मोदी-शिंदे यांची 'केमिस्ट्री':देवेंद्र फडणवीस म्हणाले – भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंगाल महत्त्वाचे राज्य

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली. या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील ‘केमिस्ट्री’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

कुठे पाऊस, कुठे उकाडा!:विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचे सावट, पश्चिम महाराष्ट्र-मराठवाड्यात 'यलो अलर्ट, यवतमाळ- गडचिरोलीत मुसळधार पावसाचे संकेत

महाराष्ट्रात सध्या हवामानाचे विचित्र स्वरूप पाहायला मिळत असून, राज्याचा एक भाग पावसाने ओलाचिंब होत असताना दुसरा भाग मात्र उष्णतेने होरपळून निघत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भातील यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात…

Read More

'विवेकयात्री' ग्रंथाचे प्रकाशन:डॉ. गणेश देवी यांनी विवेकवादाची मशाल तेवत ठेवण्याचे केले आवाहन

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी विवेकवादाची मशाल तेवत ठेवण्याचे आवाहन केले. राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘विवेकयात्री’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. विवेकवादाची शिळा शिखरावर नेणाऱ्या विवेकवादी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, नव्या उमेदीने काम करत राहण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रसिद्ध लेखक डॉ. अभिजित वैद्य यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन राज्य मराठी विश्वकोश…

Read More

संग्रामबापूंनी केलेली शाईफेक अगदी योग्यच:ही शाईफेक नसून दुखावलेल्या भावनांचा उद्रेक, धर्माविरोधात बोलायला यांना कोण प्रवृत्त करते?-संग्राम जगताप

ज्या लोकांनी धर्मांकरता पूर्ण जीवन समर्पित केले. भगव्या ध्वजा करता ज्यांनी स्वत:चे जीवन समर्पित केले आहे त्याच्यावर कुठेच नसणाऱ्या पक्षाचे लोकं उठतात आणि टीका करतात, आणि घुसखोर ‘हभप’ म्हणत एक यादी वाचून दाखवतात यामुळे हभप संग्रामबापू भंडारे यांनी त्यांच्यावर जी शाईफेक केली ती अगदी योग्य आहे, आम्ही त्यांचे समर्थन करतो, त्यांनी योग्य भूमिका घेतली आहे,…

Read More

खेडमध्ये वारस नोंदीसाठी महिला तलाठी, कोतवाल लाच घेताना जेरबंद:5,500 रुपयांची लाच घेताना एसीबीची कारवाई

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वारसनोंदीसाठी 5,500 रुपयांची लाच घेताना एका महिला तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. निमगाव खंडोबा येथील तलाठी मनीषा साहेबराव माने (वय 45) आणि कोतवाल दत्तात्रय छबू चव्हाण (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी एका 34 वर्षीय…

Read More