Headlines

खेडमध्ये वारस नोंदीसाठी महिला तलाठी, कोतवाल लाच घेताना जेरबंद:5,500 रुपयांची लाच घेताना एसीबीची कारवाई

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वारसनोंदीसाठी 5,500 रुपयांची लाच घेताना एका महिला तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. निमगाव खंडोबा येथील तलाठी मनीषा साहेबराव माने (वय 45) आणि कोतवाल दत्तात्रय छबू चव्हाण (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी एका 34 वर्षीय…

Read More

महायुती सरकार बिल्डर धार्जिणे:मीरा भाईंदरमधील ६००० कोटींची २५४ एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव – वडेट्टीवार

मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे. मूळची सरकारी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई केली असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथे…

Read More

विकास गोगावलेंचा शिवसैनिकांना थेट दम:श्रीवर्धन, म्हसळा आणि दिवेआगारनंतर महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, गद्दारांविरोधात एल्गार

रायगड जिल्ह्यात शिवसेना अधिक आक्रमक होताना दिसत आहे. बिरवाडी येथील सभेत शिवसेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी संघटनेशी बेईमानी करणाऱ्यांना थेट इशारा दिला. गद्दारी करायची असेल तर तुमचा मार्ग मोकळा आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी शिवसैनिकांचे कान टोचले. याचवेळी महाड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत खरवली-काळीज ग्रामपंचायतीवरील सत्ता शिवसेनेकडे आल्याने रायगडच्या राजकारणात…

Read More

अकोट पालिकेत कचऱ्याचे राजकारण; सत्ताधारी अन् विरोधकांमध्येच जुंपली:कचरा उचलण्यावरून नगरसेविकेचा संताप; विरोधक म्हणतात स्टंट‎

शहरातील प्रभाग क्र १ च्या नगर सेविका रेशमा परवीन अजीम इनामदार यांनी प्रभागात नाले सफाई आणि कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने स्वतः हातात घमेले आणि फावडे घेऊन वॉर्डात साफसफाई करावी लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घंटागाडी प्रभागात येत न . ७ मे रोजी सोशल मीडियावर प्रभाग क्र १ च्या नगर सेविका यांना स्वतः…

Read More

आत्मविश्वास:सोशल मीडियाला ‘नो'', पण युट्युबचा केला ‘स्मार्ट'' वापर‎, अंजनगावच्या रिद्धीने गाठलं दहावीच्या परीक्षेत 100 टक्क्यांचे शिखर

“मी कधीही रात्र रात्रभर जागून किंवा पहाटे उठून तासनतास अभ्यासही केला नाही. मात्र, जेव्हा अभ्यास करायची, तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायची. तसेच आज इतक्यावेळात इतका अभ्यास पुर्ण करायचाच, असे स्वतःलाच चॅलेंज द्यायची आणि ते पूर्णही करायची. विशेष म्हणजे, अभ्यासासाठी आई-वडिलांनी कधीही ताण दिला नाही. इतकेच टक्के गुण मिळव, असेही त्यांनी कधी सांगितले…

Read More

यंदा मुलींचीच सरशी; निकालात 2.80 टक्क्यांची घट:जिल्हा विभागात तिसरा, बहुतेक शाळांनी राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा‎

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ८ रोजी घोषित करण्यात आला. या निकालात पुन्हा मुलांच्या तुलनेत मुलींनीच सरस कामगिरी केल्याचे दिसून आले. अंजनगाव सुर्जी येथील रायसाहेब मोती संगई इंग्लिश स्कूलच्या रिद्धी शर्माने १०० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे होलिक्रॉस हायस्कूलच्या…

Read More

खा.लंके पुणे येथील रुग्णालयात दाखल:अन्नातून विषबाधा ‎झाल्याचा संशय‎

निर्जलीकरण आणि अन्नातून विषबाधा झाल्यामुळे खासदार नीलेश लंके यांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असतानाही लंके यांनी कामाचा धडाका सुरूच ठेवला होता, मात्र थकवा वाढल्याने त्यांना उपचार घ्यावे लागले. तमिळनाडूतील जिंजी किल्ला मोहिमेनंतर कोल्हापूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या खा. लंके यांना…

Read More

"राजकमल उड्डाणपुलाचा खोळंबा; संथ कामावरून काँग्रेस आक्रमक:शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचा ठपका‎

रेल्वे स्टेशन ते राजकमल चौक उड्डाणपुल बंद असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ट्रॅफिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. मात्र जनप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे एकूणच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ८ रोजी अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम…

Read More

महिला संघटनांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहिणींना सहकार्य करावे- ज्योती राठी:विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनचा पदग्रहण साेहळा उत्साहात साजरा‎

सामाजिक संस्था समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात. महिला संघटनांचे योगदान मोठे आहे. विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत बहिणींना महिला संघटनांनी सहकार्य करून, समाजातील एका वर्गाला प्रगतीकडे घेऊन जावे, असे मार्गदर्शन अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठनच्या अध्यक्षा ज्योती राठी यांनी केले. विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनच्या एकादश सत्राचा शानदार शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दशम सत्राची समाप्ती आणि…

Read More

उशीरा जाग:मोहोळ येथे महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक ठप्प‎, मोहोळमध्ये महामार्ग प्राधिकरणाचा गलथान कारभार

प्रतिनिधी | मोहोळ मोहोळ-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बडीशेपची वाहतूक करणारा ट्रक (क्र. टीएन ८८ ए ९३५८) शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बॅरिकेट्सवरून पलटी झाला. या अपघातामुळे मोहोळ सर्विस रोडवर एसटी बससह मालवाहतूक गाड्यांची मोठी कोंडी झाली होती. मात्र, एनएचएआय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा ट्रक दिवसभर रस्त्यावरच पडून होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More