Headlines

Chandrakant Kaire Demand to Ban MIM Party Over Nida Khan Case

नाशिकच्या बहुचर्चित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आल्यानंतर जिल्ह्यासह राज्याचे राजकारण तापले आहे. निदा खानला लपवण्यामागे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे मंत्री संजय शि . नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात आरोपी असलेली निदा खान ही गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होती. नाशिक जिल्हा सत्र…

Read More

महालक्ष्मी सरस 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:71 लाख महिलांचा सहभाग, सात दिवसांत 15 कोटींची उलाढाल

२ मे २०२६ पासून सुरू झालेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या सात दिवसांत प्रदर्शनातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीओओ निलेश सागर आणि सीईओ निखिल ओसवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. सीओओ निलेश सागर यांनी सांगितले की, महिलांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट…

Read More

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे, संकल्प सप्ताहाची सांगता:राज्य थॅलेसेमियामुक्त करूया – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे, अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर १ ते ८ मेदरम्यान “संकल्प सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त आयएमए हॉल, समर्थनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. जनजागृती, समाजाचा सहभाग आणि आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हा लढा सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान…

Read More

समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी काम करा:मंत्री संजय शिरसाट यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

सामाजिक न्याय विभागाने समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी काम करावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले. ‘सामाजिक न्याय’ संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने लोणावळा येथे आयोजित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी…

Read More

गॅस टँकरच्या धडकेत दाम्पत्याचा जागीच मृत्यू:खेड शिवापूर टोलजवळ अपघात, संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. एका गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वारजे माळवाडी येथील राजेंद्र बबन मोरे (वय ५५) आणि सविता राजेंद्र मोरे (वय ४२) हे दाम्पत्य त्यांच्या…

Read More

कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:आरोपी निदा खानला 11 मे पर्यंत पोलिस कोठडी; 'मलेशिया कनेक्शन' आणि 'मनीट्रेल'चा तपास सुरू

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना, यातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने २ मे रोजी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ती फरार होती. अखेर गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले. आज तिला नाशिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची…

Read More

पावला पावलांवर लपलेला इथं वासनांध साप आहे:बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे; राजकुमार नायकांची कवितेद्वारे व्यथा

दबा धरून बसलेली गिधाडे, कुठपर्यंत विश्‍वास ठेवायचा, नुसते मोर्चे काढून कुठपर्यंत दिवा लावायचा, पावला पावलावर लपलेला इथं वासनांध साप आहे, बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे, या कवितेतून सवना (जि.हिंगोली) येथील कवी राजकुमार नायक यांनी सध्याच्या परिस्थितीची भीषणता मांडली आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी आता बंदुकीचे लायसन मुलींच्या वडिलांना दिले पाहिजे, अशी मागणीही…

Read More

भाजप 2029 मध्ये एकनाथ शिंदेंना देणार धक्का:अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने सांगितला प्लॅन

भाजप 2029 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वबळावर निवडून लढवेल, असा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. परिणामी, 2029 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या राजकारणात मोठे फेरफार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे….

Read More

हिंगोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३ टक्के:मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घसरण, सीसीटीव्हीची नजर अन कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम

हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल ८३.२६ टक्के लागलाअसून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात तब्बल ९ टक्के घसरण झाली आहे. दहावी व बारावी परिक्षेमध्ये निकालात झालेली घसरण शैक्षणिक वर्तुळातून चिंता वाढविणारी ठरू लागली आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील सहा ते सात वर्षापासून कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे. यावर्षी देखील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक…

Read More

'एल निनो' च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रोजगाराला चालना:शेत, पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्या -मंत्री भरत गोगावले

रोजगार हमी योजना विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन तसेच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन ग्रामीण रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा आणि ग्रामविकासाला गती देण्याच्या दृष्टीने मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विभागीय…

Read More