Headlines

दाहकता:चिंचवण येथे पाणीटंचाई; टँकरचा प्रस्ताव रखडला, गावची पाणीपुरवठा विहिर पूर्ण आटली‎

चिंचवण (ता. सिल्लोड) येथे २० फेब्रुवारीपासून सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे पाणी पूर्णतः आटल्याने गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामसेवक व प्रशासक यांनी परिसरातील खासगी विहिरींची पाहणी केली. मात्र कोणत्याही विहिरीतून दररोज दरडोई किमान २०…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:अतिक्रमण काढण्यापूर्वी पुनर्वसन करावे, वेरूळला भक्त निवासासह इतर कामे पूर्ण करण्याचे आदेश

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन वेरूळ विकास आराखड्याबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच बैठक होती. त्यांनी अतिक्रमण हटवण्यापूर्वी पुनर्वसनाचा विचार करण्याचे निर्देश दिले असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी आवश्यक सुविधा, भक्त निवास आणि मंदिर परिसरातील महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. वेरूळ विकास…

Read More

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त लाडसावंगी गावात पायी पदयात्रा

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण होते. विविध कार्यक्रम घेण्यात आले. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजता महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन झाले. येथून भव्य पायी पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मानवंदना…

Read More

पांगरा शिंदेत 2 वर्षांपूर्वी पथकाची पाहणी:भूकंपाच्या कारणांचा अहवाल दिला नाही, भूकंपाचे केंद्र असलेल्या गावाचा शनिवारी रात्रीचा मुक्काम घराबाहेर

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू पांगरा शिंदे (ता.वसमत)गावात होता. या गावात गेल्या ७ वर्षांत भूकंपाचे ६ धक्के बसले आहेत. तसेच वारंवार भूगर्भातून आवाज येण्याचे प्रकार घडतात. जुलै २०२४ मध्ये आपत्ती व्यवस्थापन . हिंगोली जिल्ह्यात १० जुलै २०२४ रोजी झालेल्या भूकंपानंतर हा मुद्दा विधानसभेत गाजला होता. यासंदर्भात भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण करण्याची घोषणा राज्य सरकारने…

Read More

बारामतीत प्रचाराला जाणार- रोहित पवार:निवडणूक उमेदवारावर नाही, तर अजित पवार यांच्या कामावर होत आहे

“बारामतीची निवडणूक ही केवळ आत्ताच्या उमेदवाराकडे पाहून नाही, तर अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर लढली जात आहे. आम्हाला बोलावले नाही तरी आम्ही प्रचाराला जाणार,’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. शनिवारी पवार हे ईदमिलन कार्यक्रमासाठी तसेच पदाधिकारी शिष्टमंडळाच्या भेटीसाठी शहरात आले होते. बारामतीत अजित पवार यांच्याकडे बघूनच सुनेत्रा पवार यांना मतदान होणार….

Read More

शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही:पवारांचे राज्यासाठी योगदान मोठे, पण त्यांचा पिंड निधर्मी; CM फडणवीसांची टीका

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत लिहिलेला लेख आणि त्यातील विधानांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. “शरद पवारांचा वारकरी विचारांशी कधीही जवळचा संबंध राहिलेला नाही. शरद पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदोन मोठे असले, तरी त्यांचा पिंड निधर्मी आहे. त्यांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा असून, त्यांनी अशी भूमिका मांडावी याचे…

Read More

भक्ती शक्ती-चाकण मेट्रो मार्गिकेचा सुधारित अहवाल:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे सादर; 12 हजार 937 कोटी खर्च अपेक्षित

भक्ती शक्ती-वाकड-नाशिक फाटा-चाकण या महत्त्वाच्या मेट्रो मार्गिकेचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. हा अहवाल २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे सादर करण्यात आला. पिंपरी-चिंचवड परिसरातील वेगाने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाढत्या प्रवासी गरजा लक्षात घेऊन या मार्गिकेचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक भागांमधील दळणवळण अधिक सुलभ…

Read More

धामोडी पारधी बेड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था:दीड किलोमीटरच्या रस्त्यामुळे नागरिकांना त्रास, प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी

दर्यापूर तालुक्यातील धामणा गावातील पारधी बेड्याकडे जाणाऱ्या दीड किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शासनाच्या ‘आदर्श गाव’ आणि ‘स्मार्ट सिटी’ सारख्या योजना असल्या तरी, या शंभर टक्के पारधी वस्ती असलेल्या गावाला मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धामणा गाव धामोडी ग्रामपंचायतीअंतर्गत येते. या गावाला जाण्यासाठी…

Read More

जिल्हा परिषदेचे सीईओ गांधींनी सुटीच्या दिवशी घेतली बैठक:गाव-खेड्यांतील योजनांच्या अंमलबजावणीची जाणून घेतली वास्तविकता

अमरावती: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व १४ गटविकास अधिकाऱ्यांची (बीडीओ) बैठक घेतली. केंद्र आणि राज्य शासनाच्या विकास योजनांची गाव-खेड्यांमधील अंमलबजावणी आणि त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सीईओ गांधी यांनी बीडीओंकडून गाव-खेड्यांची सध्याची वास्तविकता आणि विविध लोकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीचे सूत्र समजून घेतले. सीईओंच्या…

Read More

मेळघाटातील आमझरी मधाला नवी ओळख:देशभरात उपलब्ध होणार; खादी-ग्रामोद्योग, वन विभाग, ग्रामपंचायतमध्ये सामंजस्य करार

मेळघाटातील ‘मधाचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमझरी येथील मध आता देशभरात उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग आणि खादी-ग्रामोद्योग महामंडळ या तीन संस्थांनी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला. हा सामंजस्य करार अमरावती येथील महसूल भवनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मेळघाटातील…

Read More