Headlines

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त लाडसावंगी गावात पायी पदयात्रा




क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण होते. विविध कार्यक्रम घेण्यात आले. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजता महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन झाले. येथून भव्य पायी पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मानवंदना देण्यात आली. पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पोहोचली. येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पठाडे, सरपंच रमेश शिंदे, उपसरपंच ईशा प्रमोद भालेराव, पंचायत समिती सदस्य पूजा धोडके, सोसायटी चेअरमन विजय काळे, माजी सरपंच सुदाम पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे उपस्थित होते. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. सभागृहातील मुख्य कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन झाले. विविध कार्यकारी सोसायटीमध्येही अभिवादन करण्यात आले. शेवटी मारुती मंदिर येथे उपस्थित नागरिक, कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त काढलेल्या पदयात्रेतून गावातील सामाजिक सलोखा, उत्साह दिसून आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *