![]()
प्रख्यात कवी आणि साहित्यिक भास्कर काळे यांच्या ‘बुद्धिस्ट सर्किट: ऊर्जेचे प्रेरणा केंद्र!’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुणे येथील स्वारगेट येथे पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात भास्कर काळे यांनी तथागत भगवान बुद्ध यांच्या ऐतिहासिक स्थळांना दिलेल्या भेटी आणि त्यातून आलेले अनुभव कथन केले आहेत. हे पुस्तक वाचकांना बौद्ध धर्माच्या प्रेरणा केंद्रांची माहिती देते. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून डी. एस. लोखंडे आणि सोनाली बगाडे उपस्थित होते. अमरावती येथून वि. दा. पवार, अमीर शहा, विजय हरणे, संजय सरवटकर, केशव हरणे, अवधूत शेंडे, श्रीकृष्ण नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप काळबांडे, मुकुंदराव देशमुख, सेतू देशमुख, सतीश देशमुख, अजय शिरभाते, हेमंत निखाडे, गोकुल खाकसे, देवदत्त खोंडे आणि किशोर गवळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भास्कर काळे यांच्या या पुस्तकाचे कौतुक केले.
Source link
भास्कर काळे यांच्या 'बुद्धिस्ट सर्किट' पुस्तकाचे प्रकाशन:पुण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ओएसडींच्या हस्ते सोहळा