Headlines

1000 शाळांत पटपडताळणी; पहिल्या दिवशीच ॲप ठप्प झाल्यामुळे गोंधळ:वैजापुरात अनेक शाळांनी ऑफलाइन माहिती केली गोळा‎




जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासाठी पटपडताळणी मोहिमेला शनिवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी स्टुडंट पोर्टल ॲप व्यवस्थित न चालल्याने अनेक शाळांमध्ये गोंधळ उडाला. ऑनलाइन नोंदी करता न आल्याने काही ठिकाणी माहिती ऑफलाईन पद्धतीने गोळा करण्यात आली. गैरहजर विद्यार्थ्यांच्या पडताळणीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात खासगी व जिल्हा परिषदेच्या १०८७ शाळांची पटपडताळणी करण्यात आली. तालुक्यातील खासगी २३ व जिल्हा परिषदेच्या ४०, अशा एकूण ६३ शाळांची पहिल्या टप्प्यात तपासणी करण्यात आली. शनिवारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली. मात्र, ही माहिती स्टुडंट पोर्टल ॲपवर ऑनलाइन भरणे आवश्यक असताना सुरुवातीला ॲपच सुरू होत नसल्याने शिक्षकांची धांदल उडाली. याबाबत वरिष्ठांना कळवण्यात आल्यानंतर काही शाळांनी माहिती तात्पुरती ऑफलाइन स्वरूपात नोंदवून ठेवली. नंतर ॲप सुरळीत सुरू झाल्यानंतर गोळा केलेली माहिती ऑनलाइन अपलोड करण्यात आली. सिल्लोड | पट पडताळणीमुळे शनिवारी ज्ञानविकास प्राथमिक शाळेतील एका पालकाने आजारी असलेल्या विद्यार्थ्यास असे उचलून आणले होते. प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये काही विद्यार्थी गैरहजर असल्याचे दिसून आले. अशा गैरहजर विद्यार्थ्यांची पटपडताळणी कशी करायची, याबाबत अद्याप स्पष्ट मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत. ^पटपडताळणीत विद्यार्थ्यांची अचूक नोंद व शंभर टक्के उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी शाळांनी दक्षता घ्यावी. तांत्रिक अडचणींबाबत वरिष्ठ स्तरावर माहिती देण्यात आली आहे. पुढील टप्प्यांमध्ये प्रक्रिया अधिक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल. हेमंत उशीर, गट शिक्षणाधिकारी, वैजापूर तालुक्यातील सर्व ३८१ शाळांमध्ये ३ टप्प्यांत ही मोहीम राबवली जाणार आहे. पुढील टप्पे १५ व २२ एप्रिल रोजी पार पडणार आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी व मार्गदर्शक सूचनांतील अस्पष्टता दूर होणे गरेजेचे आहे. पटपडताळणीसाठी केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, पोषण आहार अधीक्षक व डायटचे अधिव्याख्याते यांचे पथक शाळांना भेट देत आहे. लॉगिनद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पारदर्शकता वाढवण्यावर भर दिला जात आहे. पैठण तालुक्यातील ४१९ शाळांची तपासणी करण्यासाठी ११० पथके नियुक्त करण्यात आली आहेत. बनावट विद्यार्थी, बनावट शाळांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही उपस्थिती तपासली जात असल्याचे पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. या तपासणीसाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *