![]()
“बारामतीची निवडणूक ही केवळ आत्ताच्या उमेदवाराकडे पाहून नाही, तर अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर लढली जात आहे. आम्हाला बोलावले नाही तरी आम्ही प्रचाराला जाणार,’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. शनिवारी पवार हे ईदमिलन कार्यक्रमासाठी तसेच पदाधिकारी शिष्टमंडळाच्या भेटीसाठी शहरात आले होते. बारामतीत अजित पवार यांच्याकडे बघूनच सुनेत्रा पवार यांना मतदान होणार. आम्ही निवडणुकीला उभे राहिलो होतो तेव्हा आम्हाला मिळालेले यश हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या नावामुळेच मिळाले होते. अजित पवार यांना मिळाले होते तेवढेच मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळावे. त्यांनी बोलावले किंवा नाही बोलावले तरीसुद्धा कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी व आमचीही इच्छा असल्यामुळे आम्ही प्रचार करू. खरातचा एन्काउंटर होईल अशी भीती अशोक खरात प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, त्याच्यावर कडक कारवाई व्हावी. खरातला अनेक बड्या नेत्यांची नावे माहिती आहेत. त्यांनी काय केले हे खरातला माहिती आहे. २८ रोजी अजित पवार यांचे निधन झाले. २७, २८ आणि २९ जानेवारीला त्याच्या बँक खात्यांत मोठी उलाढाल झाली कशी, कोण नेता कशासाठी येत होता, कुठल्या हेतूने तेथे पूजा करण्यात येत होत्या, या सर्व गोष्टी खरातला माहिती असल्यामुळे ही माहिती काही लोकांना अडचणीत आणू शकते. त्यामुळे उद्या त्याची आत्महत्या झाली असे दाखवण्यात येईल किंवा एन्काउंटरमध्ये त्याला मारले जाईल, अशी भीती आम्हाला वाटते, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
Source link
बारामतीत प्रचाराला जाणार- रोहित पवार:निवडणूक उमेदवारावर नाही, तर अजित पवार यांच्या कामावर होत आहे