Headlines

बंजारा टायगर संघटनेचे आंदोलन मागे:मंत्री जयकुमार गोरेंच्या आश्वासनानंतर पेच सुटला, तांडा समृद्धी योजनेतील निधीवाढीवर सकारात्मक चर्चा

बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत प्रलंबित कामे, निधीवाढ, तसेच तांड्यांच्या मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट…

Read More

गंगापूरला शेकडो तक्रारींचा निपटारा; प्रमाणपत्रांचे वाटप:नागरिकांनी मांडल्या पाणी, वीज, रस्ते, महसूलच्या तक्रारी‎

गंगापूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यात आला. या जनता दरबारात नागरिकांनी पाणी, वीज, रस्ते, महसूल, शासकीय योजनांचा लाभ याबाबत विविध तक्रारी नागरिकांनी मांडल्या. आमदार बंब यांनी प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे आदेश देत अनेक प्रकरणे जागेवरच…

Read More

उंडणगावचे आरोग्य केंद्रच आजारी:जिल्हा परिषद सदस्यांची अचानक भेट, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह‎

उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन वाघ यांनी नुकतीच मंगळवारी सकाळी अचानक भेट दिली असता रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे हे रुग्णालयच आजारी असल्याचे दिसून आले आहे. आरोग्य केंद्रातील अनेक गंभीर त्रुटींमुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी तपासणी दरम्यान ओपीडी नोंद रजिस्टर मेंटेन नसल्याचे व फार्म शिष्ट जवळचे…

Read More

तरुणांच्या पुढाकाराने साठ वर्षांनंतर लक्ष्मीमातेचा यात्रोत्सव उत्साहात:हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ‎

सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरालगत असलेल्या बोजगाव येथे सुमारे साठ वर्षांपासून खंडित झालेली लक्ष्मी मातेची पारंपरिक यात्रा यंदा गावातील तरुणांच्या पुढाकारातून आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू करण्यात आली. या ऐतिहासिक पुनरुज्जीवनामुळे गा . सामाजिक एकात्मता अधिक दृढ या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील एकजूट आणि सामूहिक सहभाग. जात, धर्म, वय या सर्व भेदांपलीकडे जाऊन ग्रामस्थांनी…

Read More

कन्नडला क्रीडा संकुलात भाजी मंडई:मोकाट जनावरे, डुकरांचा सुळसुळाट, कचऱ्यामुळे पसरली अस्वच्छता‎

येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये नगर परिषदेने कोरोना काळापासून सुरू केलेली भाजी मंडई अद्यापही सुरू असल्याने खेळाडूंमधून संताप व्यक्त केला जात आहे. तालुका क्रीडा संकुल कन्नड-चाळीसगाव रस्त्यावर आहे. कन्नड शहराच्या हृदयात २ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्रफळावर तालुका क्रीडा संकुल आहे. या ठिकाणी मल्टिपर्पज सभागृह, कबड्डी, व्हॉलीबॉल मैदान, धावपट्टी, तसेच कुस्ती, व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र आहे. या…

Read More

धुळगावची दिव्या बनली पोलिस:आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असतानाही यशाला गवसणी‎

एकीकडे आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असताना आणि दुसरीकडे नातेवाईकांकडून विवाहासाठी होणारा दबाव झुगारून, धुळगाव (ता. येवला) येथील दिव्या बारहाते हीने पोलीस दलात झेप घेत आपले आणि वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही दिव्याने जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात नाशिक पोलिस दलात स्थान मिळवले आहे. दिव्याचे प्राथमिक शिक्षण धुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत,…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावाच्या दौऱ्यावर:नेमके कारण काय? जिल्हा परिषदेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला राजकीय रंग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तीन दिवसांचा सातारा दौरा सुरु झाला असून त्यांच्या दरेगाव भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दौरा अधिकृतपेक्षा खाजगी असल्याचे सांगितले जात असले तरी, अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय नजरेने पाहिले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत मोठे राजकीय नाट्य रंगले होते. या…

Read More

सकारात्मक जीवनशैली घडविण्यासाठी मैदानी खेळांचे महत्व- सुमित कोल्हे:कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीगचे उत्साहात उद्घाटन,मान्यवरांची उपस्थिती‎

व्यस्त जीवनशैलीतून मानसिक ताजेपणा मिळविण्यासाठी आणि अडचणींना सामोरे जाण्याची ताकद निर्माण करण्यासाठी खेळासारखा उत्तम पर्याय दुसरा नाही. खेळातून सांघिक भावना वाढीस लागून एकोपा निर्माण होतो. म्हणून सकारात्मक जीवनशैली घडविणासाठी खेळाचे जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी काढले. कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन तालुका…

Read More

गहू खरेदीसाठी तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी:व्यापारी कमी दराने गहू करतात खरेदी, तहसीलदारांना दिले निवेदन‎

गहू पिकासाठी शासनाच्या हमी भावाने खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे बाजार समितीच्यावतीने तहसील डॉ. संजय बिरादार यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात १८,७८६ हेक्टरवर गव्हाचे क्षेत्र असू . परंतु मागील महिन्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात गहु पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाजारात गव्हाचे दर शासनाने जाहीर…

Read More

शनिशिंगणापूर देवस्थानला आता मिळणार ‘मंत्रालयीन’ बळकटी‎:कार्यकारी अधिकारीपदी कक्ष अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; 30 एप्रिलपर्यंत मागवले अर्ज

. प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार आता अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आता मंत्रालयीन ‘कक्ष अधिकारी’ दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. २०१८ च्या विशेष कायद्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थान सरकारी अखत्यारीत आले…

Read More