छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडवर भीषण अपघात:भरधाव ट्रकची कारसह दोन रिक्षांना धडक, 7 ते 8 जण गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडवरील अत्यंत वर्दळीच्या वाल्मी चौकात भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने एका एर्टिगा कारसह दोन प्रवासी ऑटो रिक्षांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी शहरातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाल्मी चौकात नेहमीप्रमाणे वाहतूक…