Headlines

कोल्हापुरातील प्रेयसीचे लग्न ठरल्यानेतिची 250 फूट खोल दरीत ढकलून हत्या:पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाची भुदरगड तालुक्यात पुनरावृत्ती

लग्न दुसरीकडे ठरल्याने प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीला २५० फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भुदरगड तालुक्यातील नाईकवाडीजवळ घडली. हत्येनंतर आरोपीने प्रेयसी बेपत्ता असल्याची खोटी तक्रार देऊन पोलिसांची दि . आरोपी श्रीपाद दिनकर वडार (२५) आणि मृत तरन्नुम बशीर नाईक हे दोघे गारगोटी येथील अवधूत कॉलनीत राहत होते. तेव्हा त्यांची…

Read More

राज्यातील 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या:मंजिरी मणोलकर यांच्यासह शुभम गुप्ता, भालचंद्र चव्हाण यांची नवीन नियुक्ती

महाराष्ट्र शासनाने सोमवारी (12 ऑक्टोबर 2026) भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 3 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार डॉ. मंजिरी मधुसूदन मणोलकर, शुभम गुप्ता आणि डॉ. भालचंद्र प्रताप चव्हाण यांना नवीन पदस्थापना देण्यात आली आहे. या बदल्यांमुळे महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ आणि बुलढाणा जिल्हा परिषदेतील…

Read More

पुढील 3 वर्षे काँक्रिट रस्त्यांची कामे थांबवणार:निधी शाळा-अंगणवाड्यांच्या विकासासाठी वळवणार, गुलाबराव पाटलांची घोषणा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या प्राधान्यक्रमात बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुढील 3 वर्षे काँक्रिटच्या रस्त्यांची कामे न करता त्यासाठी उपलब्ध होणारा निधी शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकासासाठी खर्च केला जाणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीनंतर ते…

Read More

शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर:3.51 लाख शेतकऱ्यांना दिलासा, तुमचे नाव यादीत आहे का?

राज्यातील कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी 12 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील 3 लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सहकार मंत्री बाबासाहेब…

Read More

जळगावमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे ‘छोटा हत्ती’ वाहन पलटी:8 ते 10 विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासात सोमवारी मोठी दुर्घटना घडली. जळगावजवळील उमाळा फाट्याच्या परिसरात शाळकरी मुलांना घेऊन जाणारे ‘छोटा हत्ती’ वाहन अचानक पलटी झाले. या अपघातात 8 ते 10 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात…

Read More

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नांदगाव खंडेश्वर तहसीलवर मोर्चा:दुष्काळी अनुदान, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी किसान सभा, शेतमजूर युनियन सहभागी

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) आज नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि शेतमजूर संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कॉम्रेड तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख दुष्काळी अनुदान, संपूर्ण…

Read More

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 58 वा पुण्यतिथी महोत्सव 24 ऑक्टोबरपासून:गुरुकुंज आश्रमात; 30 ऑक्टोबरला ऐतिहासिक मौन श्रद्धांजली

क्रांतीदर्शी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५८ वा पुण्यतिथी महोत्सव २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे आयोजित केला आहे. या आठ दिवसीय महोत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होतील. यात ३० ऑक्टोबर रोजी होणारी ऐतिहासिक मौन श्रद्धांजली हा मुख्य कार्यक्रम असेल. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाने या महोत्सवाचे नियोजन केले आहे. त्यासाठी अनेक समित्याही…

Read More

सव्वा दोन कोटींच्या सोनेचोरीचा 12 तासांत छडा:खडक पोलिसांनी काका-पुतण्याला अटक करत 2 किलो 200 ग्रॅम सोने जप्त केले

रविवार पेठेतील घरातून तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे चोरणाऱ्या दोन संशयितांना खडक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. आरोपींकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालासह अतिरिक्त ४६ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २ कोटी २४ लाख ६६२ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुस्तफा नजीर शेख (वय ३६) आणि…

Read More

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी:पुढील पाच वर्षांसाठी एकमताने निवड, सुनील रासने कोषाध्यक्ष

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली. सोमवारी (दि.१२ ऑक्टोबर) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही निवड पाच वर्षांसाठी आहे. तसेच माजी अध्यक्ष सुनील रासने यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, विद्यमान उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ….

Read More

बारामतीत सुनेत्रा पवारांचा मोठा राजकीय विजय:युगेंद्र पवारांच्या पॅनेलचा सुपडा साफ, सोमेश्वर कारखान्याच्या 21 पैकी 21 जागा जिंकल्या

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने एकतर्फी बाजी मारली. युगेंद्र पवार यांच्या पॅनेलसह पुरुषोत्तम जगताप यांच्या गटालाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे बारामतीच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ…

Read More