![]()
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी (दि. ३१) पुण्यात होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे हेही बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, दीपक पोटे, विश्वास ननावरे पदाधिकारी योगेश बाचल,अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर यांची उपस्थिती होती. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात सकाळी नऊ वाजता बैठकीला सुरुवात होईल. चव्हाण यांनी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणी बैठक आहे. या बैठकीला पक्षाचे केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, राष्ट्रीय व राज्य परिषद सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा प्रभारी, विविध मोर्चांचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, माजी खासदार व माजी आमदार यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीसह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. राजकीय आणि सामाजिक विषयांवरील ठराव या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. या महत्वपूर्ण बैठकीच्या माध्यमातून आगामी रूपरेषा देखील ठरवण्याचे निश्चित करण्यात येणार आहे.
Source link
भाजप प्रदेश कार्यकारिणीची पुण्यात बैठक:मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार, रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक