Headlines

बारामतीत पुण्यातील उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला:कटफळ येथील घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त




पुण्यातील उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामती तालुक्यातील कटफळ येथे हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला आणि त्यामागे कोणाचा सहभाग आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. हल्ल्यात जखमी झालेल्या राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामती एमआयडीसी परिसरातील सिटी हेल्थ केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका कशामुळे झाला, हल्लेखोर कोण होते आणि घटनेमागील कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासातून या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या हल्ल्याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतर घटनेचे स्वरूप आणि त्यासंदर्भातील पुढील तपशील स्पष्ट होतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *