Headlines

नाशिकचे रस्ते आज टकाटक झालेत:मुख्यमंत्र्यांनी महिन्यातून एकदा इकडे यायला पाहिजे, छगन भुजबळ यांचा मिश्किल टोला




सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले, ज्याला मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना मिश्किल टोला लगावत म्हटले की, नाशिकचे रस्ते आज टकाटक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिन्यातून एकदा नाशिकला यायला पाहिजे. आमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री मोटारीने नाशिकपर्यंत आले त्यांचे खूप खूप आभार. जागोजागी पोलिस पण थांबवले आहेत. अजिबात ट्रॅफिक देखील जाम होऊ देत नाहीत. इगतपुरीपासून नाशिकला येईपर्यंत हाडे खिळखिळा होतात, असा टोला भुजबळ यांनी लगावला. छगन भुजबळ म्हणाले, नाशिकसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे. ही इमारत इतर जिल्ह्यात जाणार होती. मात्र आम्ही मीटिंगमध्ये नाशिक निवडले. स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी कोणतीही अडचण आणली नाही, त्यांचे आभार. प्रत्येक वेळी पुणे येथे जाणे शक्य नव्हते, म्हणून नाशिकला हे उपकेंद्र खूप आवश्यक होते. तसेच कोणाचे नाव घुसण्याचे प्रयत्न नको, ज्याचे नाव घेत आहे तेही खूप मोठी माणसं आहेत, असे भुजबळ यांनी म्हटले. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मी मुख्यमंत्री महोदय यांची परवानगी घेऊन बोलायला उभा राहिलो आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी खूप कष्ट होते. नाशिकचे रस्ते आज टकाटक झाले आहेत. महिन्यातून तुम्ही एकदा तरी इकडे यायला पाहिजे, असा टोला भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलताना लगावला. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, हे नाशिकच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने टाकलेले एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *