Headlines

लंडनहून परतताच उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट:मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा

लंडन दौऱ्यावरून मध्यरात्री दीड वाजता मुंबईत दाखल झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी थेट ‘सह्याद्री’ अतिथीगृह गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. वरवर पाहता ही भेट गणेशोत्सवाच्या निमंत्रणासाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी बंद दाराआड झालेल्या या गुप्त विचारविनिमयात केंद्र आणि राज्यातील बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे….

Read More

स्वच्छ वायू सर्वेक्षण, मुंबई, दिल्लीला‎ मागे टाकत संभाजीनगर देशात 16वे:वर्गवारी वाढल्यामुळे केंद्र सरकारकडून निधी मिळण्याचा मार्ग सोपा‎

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान‎बदल मंत्रालयाच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण‎२०२६’ मध्ये छत्रपती संभाजीनगर‎महानगरपालिकेने १० लाखांपेक्षा अधिक‎लोकसंख्या असलेल्या देशातील ४८ प्रमुख‎शहरांच्या श्रेणीत थेट १६ वा क्रमांक पटकावला‎आहे. यंदा पालिकेने उत्तुंग झेप घेत २०० पैकी‎१७८ गुण मिळवले. धूळ नियंत्रण, कचरा‎व्यवस्थापन, उघड्यावर कचरा जाळण्यास‎अटकाव आणि नियमित यांत्रिक‎साफसफाईमुळे शहरातील हवेची गुणवत्ता‎मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे.‎ या क्रमवारीत मुंबई (२८ वा…

Read More

2029पूर्वी 21 राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार- गृहमंत्री शहा:प्रत्येक घुसखोराला शोधून देशाबाहेर हाकलण्याचाही दिला इशारा

देशात घुसलेल्या प्रत्येक बेकायदा घुसखोराला शोधून देशाबाहेर हाकलणार, असा इशारा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईत दिला. तसेच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या(रालोआ) २१ राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. नरिमन पॉईंट येथील मविम सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा, एनआरसी…

Read More

मातंग समाजही आझाद मैदानात उतरणार:29 सप्टेंबरपर्यंत अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्याची मागणी; निर्णय न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीवरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र वाटा मिळावा, या मागणीसाठी मातंग समाजाच्या नेत्यांची नांदेडमध्ये बैठक झाली. या बैठकीत सरकारला 29 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या मुदतीत उपवर्गीकरणाबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर राज्यभरातील मातंग…

Read More

घाटी रुग्णालयात १५०० रेबीज लसींचे डोस दाखल:रुग्णांना मोफत उपचार मिळणार, मनपा-घाटी वादामुळे थांबलेला खर्च वाचणार

घाटी रुग्णालयात श्वानदंशग्रस्त (कुत्रा चावलेल्या) रुग्णांसाठी १५०० ए.आर.एस. (अँटी रेबीज सिरम) लसींचा साठा मिळाला आहे. एनएबीएल अहवालासह हे डोस उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचा आगामी महिनाभरासाठी लसीकरणाचा खर्च वाचणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरातून दररोज सरासरी ५० ते ६० श्वानदंशाचे रुग्ण घाटी रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घाटीत रेबीज लस उपलब्ध नव्हती. यामुळे गरीब…

Read More

नदीजोड योजनेच्या घोषणाच; मराठवाड्याला थेंबभर पाणी नाही:७ वर्षांपासून केवळ बैठका, आता १५ ते १७ सप्टेंबरला आंदोलन करणार

मराठवाड्याला पार-गोदावरी नदीजोड योजनेचे पाणी मिळालेले नाही. कोकणातील उल्हास आणि वैतरणा खोऱ्यातील १५५ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याची मागणी आहे. ही योजना जाहीर होऊन सात वर्षे झाली, तरी मराठवाड्याला पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. याविरोधात मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीने १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. ही माहिती…

Read More

2900 Police, SRPF, QRT Deployed

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातारा पोलिस दल सज्ज झाले आहे. 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या उत्सवासाठी जिल्ह्यात 589 सार्वजनिक गणेशमूर्तींसह तब्बल 2 लाख 75 हजार 192 घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष् . उत्सव काळात एक पोलिस अधीक्षक, एक अपर पोलिस अधीक्षक, आठ पोलिस उपअधीक्षक, 129 पोलिस अधिकारी, 2900 पोलिस अंमलदार आणि 1100 होमगार्ड बंदोबस्तासाठी…

Read More

न्यू आझाद गणेश मंडळ वर्षभर पुरवते सेवा:रक्तदान, रुग्णसेवा, आपत्तीग्रस्तांना भोजन-निवास अन् महिला सुरक्षेसाठी मदत पथक

नगरसेवक दिनेश बूब यांच्या नावाने ओळखले जाणारे न्यू आझाद गणेश मंडळ वर्षभर सेवाकार्य करते. रुग्णसेवा, रक्तदान, आपत्तीग्रस्तांना भोजन-निवास, हताश-निराश झालेल्यांचे समुपदेशन आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मदत पथक अशी या मंडळाची सेवा आहे. त्यामुळे या मंडळाचा गणेशोत्सव अमरावतीकरांना भक्तीचा आनंद देणारा असतो. न्यू आझाद गणेश मंडळातील श्रींची मूर्ती दरवर्षी जागेवरच बनवली जाते. त्यामुळे आगमन मिरवणूक नसते. मात्र…

Read More

‘सेवा संकल्प अभियान नसून मेवा संकल्प अभियान’:अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सुरू करण्यात येणारे ‘सेवा संकल्प अभियान’ हे प्रत्यक्षात ‘मेवा संकल्प अभियान’ असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. देशाची राजधानी दिल्ली असली, तरी आर्थिक राजधानी मुंबई आहे. या आर्थिक राजधानीत येऊन भाजपला जास्तीत जास्त ‘मेवा’ कसा मिळवता येईल, याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित…

Read More

19 वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत केली आत्महत्या:महिलेसोबतचे प्रेमप्रकरण भोवले, पतीला समजताच उचलले टोकाचे पाऊल

सूर्यनगरी परिसरातील जयश्री अपार्टमेंटमध्ये 19 वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर बारामती आणि त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. अविष्कार अमोल ढोले असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविष्कार हा शिक्षणासाठी सूर्यनगरी परिसरातील जयश्री…

Read More