कुत्र्यांच्या दहशतीने नेवासकर रस्त्यावर; प्रशासनाला साडी अन् बांगड्यांचा आहेर:कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांत संताप, कारवाईचे नगराध्यक्षांचे आश्वासन
शहरातील मोकाट कुत्र्यांचा आणि जनावरांचा वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ सोमवारी नेवासकरांनी नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यांत वृद्ध महिला आणि शाळकरी मुलांसह अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत मोर्चेकऱ्यांनी बांगड्या आणि साडी देऊन प्रशासनाचा निषेध केला. सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, शिवा राजगिरे आणि…