Headlines

वैजापूरमध्ये 16 सौर प्रकल्पांमधून 55 मेगावॅट विजेची होतेय निर्मिती:दिवसा वीज मिळत असल्याने शेतीच्या सिंचनाची सोय‎




दुष्काळी पट्टा आणि शेतीसाठी विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्याची आता ऊर्जा क्षेत्रात नवी ओळख निर्माण होत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत तालुक्यात उभारलेल्या १६ सौर ऊर्जा प्रकल्पांमधून ५५ मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता उभी राहिली आहे. विशेष म्हणजे तालुक्याची सरासरी वीज गरज केवळ ४० मेगावॅट इतकी असताना स्थानिक पातळीवर त्यापेक्षा अधिक क्षमतेची निर्मिती होत आहे. त्यामुळे कृषी फीडरना दिवसा वीजपुरवठा करणे सुलभ झाले असून १४० गावांतील शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. धोंदलगाव, लोणी, भायगाव, वाकला, चिकटगाव, नागमठाण, महालगाव, खंडाळा, खरज, तलवाडा, बाभूळगाव, शिऊर, लाडगाव, बोरसर आणि पारळा गावांत उपकेंद्रांजवळ उभारलेल्या सौर प्रकल्पांमुळे वीज वहनाचे अंतर कमी झाल्याने लाइन लॉस आणि ट्रान्समिशनवरील ताणही घटला आहे. वाढती वीज मागणी, शेतीचे यांत्रिकीकरण आणि स्वच्छ ऊर्जेची गरज लक्षात घेता सौरऊर्जा वैजापूरच्या ऊर्जा व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार बनत आहे. उपकेंद्राजवळ प्रकल्प; कमी झाला लाइन लॉस बहुतेक सौर प्रकल्प उपकेंद्रांपासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर उभारण्यात आले आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या वीज वहनाची गरज कमी झाली. परिणामी ट्रान्समिशन लॉस कमी होणे, व्होल्टेज अधिक स्थिर राहणे शक्य झाले आहे. तालुक्यात महावितरणच्या ग्रामीण-१ आणि ग्रामीण-२ विभागांतर्गत १६ सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांची एकत्रित क्षमता सुमारे ५५ मेगावॅट आहे. तालुक्याची सरासरी वीज गरज सुमारे ४० मेगावॅट असल्याने स्थानिक पातळीवरच अतिरिक्त वीजनिर्मितीची क्षमता उपलब्ध झाली आहे. Ã तालुक्यात उभारलेल्या सौर प्रकल्पांमुळे कृषी फीडरना स्थानिक पातळीवर वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे दिवसा अधिक दर्जेदार व स्थिर वीजपुरवठा करणे शक्य झाले आहे. उपकेंद्राजवळ वीजनिर्मितीमुळे ट्रान्समिशनवरील ताण कमी होत आहे. – योगेश मोरे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, वैजापूर सौर पॅनलवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशातून डीसी स्वरूपात वीज तयार होते. इन्व्हर्टरद्वारे ती एसीमध्ये रूपांतरित केली जाते. रोहित्राच्या साहाय्याने दाब वाढवून वीज जवळच्या उपकेंद्रात पाठवली जाते. तेथून कृषी फीडरद्वारे गावागावांपर्यंत वीजपुरवठा केला जातो. या सौर प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेचा लाभ सुमारे १४० गावांतील कृषी फीडरना होत आहे. दिवसा वीज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने सिंचन करता येत असून रात्रीच्या वीजपुरवठ्यावरचे अवलंबित्व कमी झाले आहे. वैजापूर तालुक्यामध्ये रोज ४० मेगावॅट गरज दिवसाही स्थिर पुरवठा करणे शक्य होत आहे १४० गावांतील कृषी फीडरला मिळतो आधार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *