Headlines

15 किलोमीटर लांब वारकऱ्यांची रांग; 60 हजारांहून अधिक वैष्णवांचा मेळा:पिंपळगाव माळवी ते अहिल्यानगर शहरापर्यंत पर्यंत भक्तिमय वातावरण‎




मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच क्षणभर आपण अहिल्यानगरात नसून थेट पंढरपुरात पोहोचलो आहोत, असा भास होत होता. चहुबाजूंनी फडकणाऱ्या भगव्या पताका, ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलाच्या अखंड गजरात मार्गक्रमण करणारे हजारो वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, गळ्यात टाळ आणि चेहऱ्यावर भक्तिभाव… संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीच्या आगमनाने शनिवारी सायंकाळी मार्केट यार्ड परिसर अक्षरशः मिनी पंढरपूर बनल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात अनेक दिंड्यांचे आगमन झाले. त्याच बरोबर सकाळपासूनच सर्वात मोठी मानली जाणारी संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी शहरात दाखल झाली. या दिंडीत सुमारे ६० हजारांहून अधिक वारकरी सहभागी असून त्यांचा मुक्काम मार्केट यार्ड परिसरात आहे. शहरात प्रवेश करताच विविध चौकांमध्ये सडा-रांगोळ्यांनी दिंडीचे स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण, टाळ-मृदंगाचा निनाद आणि काही ठिकाणी झालेली फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण शहर भक्तिरंगात उर्वरित पान ४ २५० फिरते शौचालय, ७२ लाखरुपयांचे मंडप जिल्हा तसेच इतर जिल्ह्यांमधून आलेल्या सुमारे २६० दिंड्या मार्गस्थ होतात. वारकऱ्यांच्या सोयी व सुविधेसाठी यंदा ३ कोटी ८६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यात एक कोटींच्या दिंडीमार्ग दुरुस्तीसह ७२ लाखांचे मंडप, ५० लाखांचे फिरते शौचालये तसेच ५० लाखांची स्नानगृहे दिली आहेत. तसेच निवृत्तीनाथ पालखीत वैद्यकीय पथके नियुक्त केली होती. ग्रंथराज श्रीज्ञानेश्वर दिंडी आज शहरात वृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीसह शहरात मुक्काम केलेल्या इतर दिंड्याही रविवारी पहाटे विठ्ठलनामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील. त्यानंतर शहरात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी दिंडी शहरात दाखल होत आहे. ही दिंडी नेवासे येथून ८ जुलैला मार्गस्थ झाली आहे. याव्यतिरिक्त इतर दिंड्याही शहरातील मार्गावर दिसणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *