![]()
श्रीरामपूर जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नेवासे रस्त्यावरील हॉटेल लक्ष्मीनारायण पॅलेस येथे शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. आकाश चंद्रशेखर दुबैया (वय ३४) असे मृत हॉटेल मालकाचे नाव आहे. या हल्ल्यात पुण्यावरून नुकतेच आलेले आकाशाचे वडील आणि भाऊ कुणाल वाचवण्यासाठी धावले असता, त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास नशेत असलेल्या तिघांनी जेवणाची ऑर्डर उशिरा आल्यावरून वेटरला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. हॉटेल मालक आकाश यांनी मध्यस्थी केली असता, हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात टीपॉय घालून तोंडावर जीवघेणा हल्ला केला. अतिरक्तस्रावामुळे आकाश यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी एका आरोपीला पकडून चोप दिला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे व अरुण धनवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीमने हॉटेल सील करत तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. मारहाणीत जखमी झालेल्या सुरज जाधव (वय २५) याच्यासह रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात लपलेला यश जाधव आणि वरच्या मजल्यावर लपलेला नर्सिंगचा विद्यार्थी ओम डफळ या तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच लॉजवर थांबलेल्या बाहेरगावच्या दोन संशयितांचा या गुन्ह्याशी संबंध आहे का, याचातपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे श्रीरामपूरशहरात मोठी खळबळ उडाली असून, रुग्णालयातव्यापारी व राजकीय नेत्यांनी मोठी गर्दी केली होती.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूहोते. आरोपींची रुग्णालयात लपाछपी घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपी सुरज जाधव(वय २५) याला पकडून चोपले, तो सध्या पोलिसांच्या ताब्यात रुग्णालयात उपचार घेत आहे.तर दुसरा आरोपी यश जाधव हा रुग्णालयाच्यास्वच्छतागृहात लपला होता. तिसरा आरोपी ओमडफळ (नर्सिंगचा विद्यार्थी) हा रुग्णालयाच्या वरच्यामजल्यावर दडून बसला होता. पोलिसांनी तिन्हीआरोपींना अटक केली आहे. तसेच लॉजवर थांबलेल्या बाहेरगावच्या अन्य दोघांचा या गुन्ह्याशीसंबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. श्रीरामपूर शहर आज बंदची हाक हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी सर्वपक्षीय नेते व व्यापारी संघटनांच्या वतीने रविवारी, १२ जुलै रोजी ‘श्रीरामपूर बंद’ची हाक देण्यात आली आहे. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य बाजारपेठ, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनात सहभागी होणार आहेत. गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई व्हावी आणि शहरातील अवैध नशेचा बाजार कायमचा उद्ध्वस्त व्हावा, या मागणीसाठी आज सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह व्यापाऱ्यांचा भव्य निषेध मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकणार आहे.
Source link
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याने हॉटेल मालकाचा श्रीरामपूरमध्ये केला खून