Headlines

जरांगेंच्या मुंबई आंदोलनाने सरकारची चिंता वाढली:गिरीश महाजन म्हणाले – ही वेळ योग्य नाही

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, आता मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबरपासून मुंबईच्या दिशेने निघण्याचा निर्णय जाहीर केला. 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका काय असेल, याबाबत मंत्री…

Read More

गोकुळ’ निवडणुकीआधी मोठा पेच:492 अवसायनातील दूध संस्थांच्या पात्रतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, मतदानाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या पंचपार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच निवडणुकीसमोरील न्यायालयीन अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. अवसानातील 492 दूध संस्थांना पात्र ठरवून अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला आता सर्वोच्य न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्या मुळे या 492 संस्थांना प्रत्यक्ष मतदान करता येणार की नाही, या वर पुन्हा प्रश्न चिन्ह…

Read More

कोणार्क कॉलनीत पुन्हा रानडुकराचा वावर:नागरिकांमध्ये भीती; मनपा आणि वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

अमरावती शहरातील कोणार्क कॉलनी (कठोरा नाका) परिसरात पुन्हा रानडुकराचा वावर दिसून आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी रानडुक्कर थेट नागरी वस्तीत फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. यापूर्वी रानडुकराच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे याच भागात रानडुक्कर फिरत असल्याने मनपा आणि वन…

Read More

सेवानिवृत्त अभियंत्याने 30 हजार बातम्यांचा संग्रह केला:यात शकुंतला रेल्वे, फिनले मिलपासून अनेक यशोगाथांचा समावेश

जलसंपदा विभागातील निवृत्त स्थापत्य अभियंता अशोक पाटील (परतवाडा) यांनी आपल्या छंदातून ३० हजार बातम्यांचे संकलन केले आहे. यामध्ये अचलपूरची बंद पडलेली शकुंतला रेल्वे आणि चांगल्या कामगिरीने अनेक दशके वर्चस्व गाजवलेल्या विदर्भ मिलच्या (सध्याचे नाव फिनले मिल) समस्येपासून ते उंच झेप घेणाऱ्या स्थानिक यशोगाथांपर्यंतच्या अनेक विषयांचा समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या या बातम्यांची दोन दिवसीय प्रदर्शनी…

Read More

किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबाव आणल्याचा आरोप:साक्ष बदलण्यासाठी धमक्या, 20 लाखांचा व्यवहार आणि बंदुकीचा धाक दाखवल्याचा दावा

तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून खटल्यात साक्षीदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे. साक्ष बदलण्यासाठी धमकी, बंदुकीचा धाक, मध्यरात्री घरी जाऊन धमकावणे तसेच पोलिस संरक्षण काढून घेण्यात आल्याचे दावे साक्षीदारांनी पिंपरीतील पत्रकार परिषदेत केले. आवारे यांच्या हत्येसाठी २० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावाही यावेळी केला. किशोर आवारे यांची १२…

Read More

वास्तुविशारद हफीझ कॉन्ट्रॅक्टर: स्मार्ट शहरांसाठी 3D, उच्च घनतेचे बांधकाम आवश्यक:वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमीन; जंगले वाचवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण गरजेचे

पद्मभूषण विजेते प्रसिद्ध वास्तुविशारद हफीझ कॉन्ट्रॅक्टर यांनी म्हटले आहे की, वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत असताना शेतजमीन, जंगले आणि पाणथळ जागांचे नुकसान करणे परवडणारे नाही. वाढत्या लोकसंख्येला सामावून घेताना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्रिमितीय (3D) आणि उच्च घनतेच्या बांधकाम पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे. ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू) येथे ‘हफीझ कॉन्ट्रॅक्टर स्कूल ऑफ आर्किटेक्चर’च्या…

Read More

स्पर्धा परीक्षा पारदर्शक करण्यासाठी टास्क फोर्सने विद्यार्थ्यांशी केली चर्चा:राज्यातून 18 हजारांहून अधिक ई-मेल्स मिळाले; पुढील वर्षभर OMR पद्धतीने परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, स्थिर आणि उमेदवारांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी राज्य शासनाने एक उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्स स्थापन केला आहे. या टास्क फोर्सने पुण्यात विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि इतर संबंधित लोकांशी चर्चा केली. या चर्चेत परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिकेची गुणवत्ता, प्रश्नपत्रिका फुटण्यापासून रोखणे, पदांची संख्या, उत्तरतालिका, परीक्षा केंद्रे, तक्रार निवारण…

Read More

संतापजनक! धाराशिवमध्ये रेशनच्या तांदळात सापडली चक्क दातांची कवळी:लोहारा तालुक्यातील जेवळी येथील धक्कादायक घटना

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे रेशनच्या तांदळात चक्क दातांची कवळी (सांगाडा) सापडल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या खळबळजनक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्वसामान्यांना वाटप केल्या जाणाऱ्या स्वस्त धान्याच्या दर्जावर आणि सुरक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेवळी येथील भागाबाई बाबुराव बिराजदार यांनी शुक्रवारी ‘गणेश प्राथमिक…

Read More

कायदा-सुव्यवस्था राखणे सर्वांची जबाबदारी:OYOच्या नियमावलीपासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनापर्यंत; चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

नागपूरमध्ये ओयो हॉटेल आणि रूम बुकिंग सेवांबाबत पोलिसांनी नवीन नियमावली तयार केली आहे. याबाबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तयार केलेल्या नियमावलीचे त्यांनी स्वागत केले. बावनकुळे म्हणाले की, ओयो हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांची नोंद ठेवणे आवश्यक असेल. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज किमान 90 दिवस जतन करावे लागणार आहे….

Read More

अंबाजोगाईत मोठी दुर्घटना!:विजेचा तीव्र धक्का लागून दोन बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, शहरात हळहळ

अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर येथे एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या स्लॅबचे काम सुरू असताना काँक्रीट भरणाऱ्या यंत्राचा (बूम) 11 केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने दोन बांधकाम मजुरांचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पंचायत समितीसमोरील मुख्य रस्त्यावर दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली असून, बबन चंद्रकांत वाघमारे आणि यशवंत कोंडीराम वाघमारे अशी या…

Read More