Headlines

हिंजवडीतील समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा:वाहतूक, पाणी, वीज प्रश्नांवर चर्चा; 30 अतिरिक्त बस, 6 रस्त्यांचे रुंदीकरण 1 डिसेंबरपासून

हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातील वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक, रस्ते, पाणी, वीज आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करून पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हिंजवडी, मान आणि मारुंजे परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा कंपनीनिहाय डेटा गोळा…

Read More

मनोज जरांगेंचे 19 सप्टेंबरपासून मुंबईत उपोषण:प्रवीण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- तुम्हाला दौरे हवेत की प्रश्न सुटायला हवेत?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून प्रस्थान करतील आणि पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर व खोपोली मार्गे मुंबईत पोहोचतील. त्यांच्या या महत्त्वपूर्ण घोषणेवर महायुतीकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते प्रवीण दरेकर यांनी…

Read More

सरकारकडून मराठवाड्याला अन्यायकारक वागणूक:विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे यांचा आरोप, छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी होणारी मंत्री मंडळाची बैठक यावर्षीही होणार नाही यावरून सरकारला मराठवाड्याच्या विकासासाठी काहीही देणेघेणे राहिलेले नाही हे स्पष्ट होत असून शासनाकडून मराठवाड्याला अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे यांनी शनिवारी ता. १३ दिव्य मराठीशी बोलतांना केला आहे. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दानवे यांच्या…

Read More

पुण्यात तीन पोलिस निलंबित:रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्याने अपर आयुक्तांची कारवाई

रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्यामुळे पुणे शहर पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर कर्तव्यात निष्काळजीपणा आणि बेशिस्त वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी या निलंबनाचे आदेश काढले. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पोलिस शिपाई शुभम विजय सुर्वे, पोलिस शिपाई योगेश भागचंद्र एकशिंगे आणि…

Read More

'आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा':ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा पुरुषोत्तम करंडक समारंभात तरुणाईला सल्ला

कलाक्षेत्रात वाटचाल करताना शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. विविध कौशल्ये आत्मसात करा आणि आपल्याला आवडते काय व येते काय, यातील फरक ओळखून पुढे जा, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी तरुणाईला दिला. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ६१व्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. हा समारंभ पुणे येथील भरत नाट्य मंदिरात झाला….

Read More

सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन:सुनेत्रा पवार म्हणाल्या, सुरक्षित मातृत्व केवळ आरोग्य नव्हे, तर सामाजिक जबाबदारी; सेवा विनामूल्य.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या ‘माहेरवाशीण – मातृत्व सेवेची नवी संकल्पना’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मातृत्वाचा प्रवास प्रत्येक महिलेने भीतीतून नव्हे, तर विश्वासातून करावा. वैद्यकीय उपचारांसोबत माया, आधार, सुरक्षितता…

Read More

Uday Samant Statement on Maratha Reservation in Dhule; 12 Demands Met

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने राज्यात वातावरण तापले असताना, राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी मोठी माहिती दिली आहे. “सरकार जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या मान्य करत असून, त्यांच्या 15 पैकी 12 मागण्या आ . जरांगे पाटलांच्या मागण्यांवर काय म्हणाले सामंत? मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना सामंत म्हणाले, “मनोज…

Read More

हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी:कोणती पूजा आधी करावी, ऋषिपंचमीचे 2 उपवास कसे सोडावे?; जाणून घेऊ पंचांगकर्ते दातेंकडून! VIDEO

यंदा गणेश चतुर्थी व हरितालिका एकाच दिवशी म्हणजे सोमवार, 14 सप्टेंबर 2026 रोजी आहे. त्यामुळे भाविकांना कोणती पूजा आधी करावी, कोणती नंतर असा प्रश्न पडला आहे. सोबतच हरितालिकेपाठोपाठ येणाऱ्या ऋषिपंचमीचे दोन उपवास कसे सोडायचे, याची सुद्धा उत्सुकता आहे. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी या बद्दल मार्गदर्शन केले. ते नेमके काय म्हणत आहेत, जाणून घेऊयात या बातमीमधून….

Read More

Gulabrao Patil Statement on Manoj Jarange; Praises CM English Skills

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “जरांगे पाटील मुंबईला जातात कधीही आंदोलन करायला, तो त्यांचा विषय आहे. मात्र न्यायालयाचा आदेश सर्वांनी पाळावा, अशी अपे . मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले असून मुंबईच्या दिशेने जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या…

Read More

मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास प्राचार्य जबाबदार:हिंगोलीच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठेंचा इशारा

हिंगोली जिल्हयात शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत, एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यासाठी प्राचार्यांना जबाबदार धरण्याचा इशारा समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी दिला आहे. या संदर्भात गुट्ठे यांनी जिल्हयातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठविले आहे. यामध्ये महाविद्यालयांमध्ये सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांमधील शिष्यवृत्तीसाठी पात्र…

Read More