पिंपळगाव पेठेत श्री सायंबा महाराजांची यात्रा उत्साहात:‘श्री सायंबा महाराज की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून श्रद्धा असलेल्या श्री सायंबा महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. यात्रेनिमित्त परिसरातील तसेच तालुक्यातील विविध गावांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढत गेली. ‘श्री सायंबा महाराज की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. श्री सायंबा महाराजांना नवस…