लंडनमध्ये विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट:'एवढा मोठा क्रिकेटपटू, पण अत्यंत साधा आणि नम्र', उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने लंडन दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या लंडन दौऱ्यात तीन मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या एकनाथ शिंदे आणि विराट यांच्यात यावेळी विविध विषयांवर दीर्घकाळ चर्चा झाली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना शिंदे यांनी या भेटीची सविस्तर माहिती दिली असून, यावेळी त्यांनी विराटचे भरभरून कौतुक…