Headlines

हॉटेलमध्ये जेवतानाच लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याचा प्रयत्न:म्हणाले- हा माझा जीव घेण्याचा प्रयत्न होता; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, जरांगेंवर गंभीर आरोप

राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष तीव्र झालेला असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरात झटापट झाल्याची घटना समोर आली आहे. हाके हे वडीगोद्रीहून सोलापूरमार्गे सांगोल्याकडे जात असताना पाकणी फाट्याजवळील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबले होते. यावेळी काही तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर हाके हॉटेलमधून बाहेर पडताना काही जणांनी त्यांची…

Read More

उत्सवांमधील ध्वनी प्रदूषणावरून यंत्रणांना कायदेशीर नोटीस:'भावना दुखावण्याचा आरडाओरडा थांबवा' – ॲड. असीम सरोदे

गणेशोत्सव आणि इतर धार्मिक उत्सवांमध्ये होणारे बेसुमार ध्वनी प्रदूषण, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि घनकचऱ्याच्या समस्येवर कायदेशीर कारवाई न करणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणांना (पोलीस, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ) कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. प्रसिद्ध वकील ॲड. असीम सरोदे यांनी ही माहिती दिली. विद्यानंद बापट यांच्या पुढाकाराने आणि अनेक नागरी संघटनांच्या पाठिंब्याने ही नोटीस पाठवण्यात आली असून, 3…

Read More

Marathi Actor Vikas Samudre Facebook Post Suicide Scare; Mumbai Police Alert

मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि नंतर तितकाच नाट्यमय प्रकार समोर आला आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ फेम प्रसिद्ध अभिनेते विकास समुद्रे यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टी, त्यांचे चाहते आणि अगदी मुंबई पोलिसांचीही मोठी धावपळ . काय होती ती पोस्ट? विकास समुद्रे यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून अचानक “I am committing Suicide…” (मी आत्महत्या…

Read More

Raigad CGST Superintendent & Consultant Arrested by CBI in Bribe Case

मुंबई2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात CGST विभागाच्या अधीक्षक आणि सल्लागाराला अटक केली आहे. आरोपींची ओळख अधीक्षक पंकज कुमार आणि सल्लागार प्रसाद कुमार स्वामी अशी झाली आहे. अधीक्षक पंकज कुमारने तक्रारदाराला 10 लाख रुपयांची लाच CGST सल्लागार प्रसाद कुमार स्वामी यांना देण्यास सांगितले होते. CBI ने गुरुवारी…

Read More

कर्जमुक्ती योजनेत 11 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर:दुष्काळाच्या सावटाखालील शेतकऱ्यांना दिलासा; लाभासाठी आधार प्रमाणीकरण गरजेचे‎

दुष्काळाच्या सावटाखालील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत ११ हजार ५० शेतकऱ्यांचा समावेश असून, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली तसेच ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत…

Read More

दुष्काळाच्या सावटात शेळावेत पोळा साजरा:पावसाअभावी बळीराजाच्या डोळ्यात पाणी‎

पावसाने मारलेली प्रदीर्घ दडी आणि करपू लागलेल्या पिकांच्या चिंतेतच यंदा शेळावे मंडळातील पोळा सण अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. वर्षभर शेतात घाम गाळणाऱ्या मुक्या जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलांचे पूजन तर केले, मात्र पावसाअभावी बळीराजाच्या चेहऱ्यावरचा उत्साह पूर्णपणे मावळल्याचे दिसून आले.दरवर्षी शेळावे गावासह संपूर्ण मंडळात पोळ्याच्या दिवशी मोठा उत्साह असतो. मात्र, यंदा ऑगस्ट आणि…

Read More

भेसळीच्या संशयावरून अहिल्यानगरला एफडीएकडून 4 कोटींचे बटर जप्त:तुकाराम मुंढेंच्या आदेशाने कारवाई, 75 हजार किलोचा साठा सील; पुण्यातही खवा अन् पनीर जप्त

सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा मोठा प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अहिल्यानगर शहरात एमआयडीसी परिसरातील एका कोल्ड स्टोरेजवर रात्री अचानक धाड टाकून तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपयांचे बटर जप्त केले आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. नागापूर औद्योगिक वसाहतीतील अरिहंत कोल्ड…

Read More

दिंडोरी‎:कॅटलॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंबे दिंडोरी येथील धनश्री राठीचे यश

आंबे दिंडोरी सारख्या ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू धनश्री अनिल राठी हिने स्पेनमध्ये पार पडलेल्या ‘कॅटलॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ मालिकेत चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. ‘ माय स्पोर्ट ट्रिप इंडिया”चे अंकित दलाल यांच्यामार्फत ती या स्पर्धेत सहभागी झाली होती. ​स्पेनमधील पाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये धनश्रीने एकूण १४४ रेटिंग पॉईंट्सची कमाई करत आपली एकूण रेटिंग…

Read More

सागरी जीवांच्या वेदना रंगमंचावर:‘व्यथा सागरी जीवांची’ विज्ञान एकांकीका अव्वल

महासागरातील प्रदूषण, प्लास्टिकचा वापर व मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेली सागरी जीवसृष्टी यांचे विदारक वास्तव प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘व्यथा सागरी जीवांची’ या विज्ञान एकांकिकेने लोहोणेर येथील जनता विद्यालयाला देवळा तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवून दिला. विज्ञान नाट्यसंघाने सलग पाचव्यांदा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात देवळा तालुक्यातील २६ शाळांनी सहभाग घेतला. ‘महासागराचे…

Read More

लोखंडी अँगल, पत्रा लागून 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू:शेंद्रा एमआयडीसीतील घटना: तिघांविरुद्ध गुन्हा‎

शेंद्रा एमआयडीसीतील ‘युनायटेड जेनेटिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत काम करताना लोखंडी अँगल व पत्रा डोक्याला आणि चेहऱ्याला लागून गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. अनिकेत गौतम सोनवणे (१९, रा. अहिल्यानगर; हल्ली रा. चिकलठाणा) असे मृत कामगाराचे नाव आहे. कंपनी प्रशासनाने सुरक्षेची कोणतीही साधनसामग्री न…

Read More