![]()
“पारनेर शहरातील विघ्नहर्ता रुग्णालय ते हिंद चौक दरम्यानच्या रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत मंजूर आराखड्याप्रमाणेच झाले पाहिजे. पुढील ५० वर्षांचा विचार करून या रस्त्यावर विविध अत्याधुनिक सुविधांसाठी आत्ताच तरतुदी करण्यात याव्यात,” अशा स्पष्ट आणि कडक सूचना खासदार नीलेश लंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या. महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत देवीभोयरे फाटा (पारनेर) ते खडकी (अहिल्यानगर) दरम्यानच्या ४८ किमी अंतराच्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या भव्य प्रकल्पासाठी ३६२ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, पारनेर शहरातून जाणाऱ्या या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सध्या उलट-सुलट चर्चा सुरू असल्याने, निर्माण झालेल्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी गुरुवारी (९ जुलै) पारनेर नगर पंचायत कार्यालयात खासदार लंके यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार लंके म्हणाले की, “हा संपूर्ण रस्ता पूर्ण झाल्यावर या मार्गावरील वाहतूक प्रचंड वाढणार आहे. या वाढत्या वाहतुकीचा ताण शहरावर येऊ नये, याच दृष्टीने आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसारच काम व्हावे. शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर सुबक दुभाजक (डिव्हायडर) आणि पथदिव्यांची (स्ट्रीट लाईट्स) चोख व्यवस्था करावी. रस्त्याचे काम मंजूर आराखड्याप्रमाणेच होईल ^ पारनेर शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर आराखड्याप्रमाणेच केले जाईल. नगर पंचायत, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी रस्त्याच्या कामात येणाऱ्या स्थानिक अडचणी सामोपचाराने सोडवण्यासाठी मदत करावी. आम्ही सर्व घटकांशी समन्वय ठेवूनच काम करू.” -सुबोध वसईकर, उपअभियंता, सा. बां. उपविभाग, पारनेर. अधिकारी व ठेकेदारांनी समन्वय ठेवावा ^ पारनेर शहराजवळील म्हसणे फाट्यावर अपघातांचे प्रमाण अत्यंत जास्त आहे, त्याठिकाणी तातडीने आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदार कंपनीने नगर पंचायतीचे पदाधिकारी आणि नागरिकांना विश्वासात घेऊन, समन्वय ठेवून काम करावे.” -डॉ. विद्या कावरे, नगराध्यक्षा, पारनेर. पारनेरच्या मुख्य रस्त्याबाबत खा. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
Source link
पारनेरमधील रस्त्याचे काम मंजूर आराखड्याप्रमाणेच करा:खासदार नीलेश लंके यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश