Headlines

महागड्या सांधेबदल शस्त्रक्रियांसाठी मिळणार सरकारी मदत‎:कॅन्सर तपासणी शिबिर, सांधेबदल शस्त्रक्रियेसाठी शासकीय मदत मिळवून देणार- चिवटे




अहिल्यानगर आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असलेला रूग्णसेवेचा महायज्ञ खरोखरच कौतुकास्पद आहे. अल्प दरात आणि वेळप्रसंगी मोफत मिळणारे दर्जेदार उपचार सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. येथील सांधेबदल (हिप व गुडघे) शस्त्रक्रियांसाठी संतोष बोथरा यांच्या आग्रहानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी दिली. आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, डॉ. वसंत कटारिया, प्रशासन अधिकारी डॉ. आशिष भंडारी व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात शिवसेनेचे सचिव राम रेपाळे म्हणाले, राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचे नाव असलेल्या या हॉस्पिटलमधील सेवाभावी कार्य इतरांसाठी आदर्शवत आहे. येथील सुसज्ज नेत्रालयातून दृष्टीदोष निर्मूलनाचे मोठे कार्य होत असून, वर्षभर चालणाऱ्या विविध शिबिरांमुळे राज्यातील हजारो रुग्णांना दिलासा मिळत आहे. हॉस्पिटलमधील जागतिक दर्जाची वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि तत्पर स्टाफमुळे राज्यभरातील रुग्ण येथे विश्वासाने येतात. हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना नेहमीच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. सांधेबदल शस्त्रक्रियेच्या रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष पाठपुरावा करण्यात येणार आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रत्येक रूग्णाला माफक दरात उच्च दर्जाच्या सुविधा दिल्या जातात. शासनाच्या योजनांसाठी मंगेश चिवटे यांनी नेहमीच मोठे सहकार्य केले असून, आता त्यांच्या माध्यमातून सांधेबदलीच्या रुग्णांनाही शासकीय मदत मिळेल, असा विश्वास आहे, असे संतोष बोथरा म्हणाले. आभार प्रशासन अधिकारी डॉ. आशिष भंडारी यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *