Headlines

वाजले टाळ-मृदंग, दुमदुमली राहुरी नगरी:निवृत्तीनाथांची पालखी चालली पंढरपुरी!, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि फुलांच्या उधळणीने वारकऱ्यांचे स्वागत‎


.

आषाढी एकादशीचे वेध लागले की संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीत रंगून जातो. “नाव ओठी, तुझे रूप ध्यानी…” या भक्तिभावाने भारावलेले हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे राहुरीत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, टाळ-मृदंगाचा गजर आणि “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.यंदाच्या पालखी सोहळ्यात ६१ उपदिंड्यांचा सहभाग असून पालखी राहुरीत मुक्काम होणार असून सकाळी ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.यावर्षी दिंडीत सुमारे ६० हजारांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. पंढरपूरपर्यंत ही संख्या लाखाच्या घरात जाण्याची शक्यता असल्याची माहिती संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष निलेश महाराज गाढवे यांनी दिली.

राहुरी शहरातील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले. अनेक ठिकाणी काही शेतकरी संघटना व तरुण युवकांनी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली होती. राहुरी शहरातील वातावरण पूर्ण भक्तीमय झाले होते. राहुरी शहरात ठिकठिकाणी वारकरी मुक्कामास होते.

पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे सर, गटनेते हर्ष दादा तनपुरे उपाध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेविका डॉ. सौ उषाताई तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, विरोधी पक्षनेते राजेंद्र उंडे, गटनेते अरुण साळवे पांडू उदावंत, संदीप सोनवणे, यांच्यासह तहसीलदार डॉ. अमित पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख,यांनीही पालखीचे स्वागत केले.

यावेळी निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे, माधव महाराज राठी, माजी अध्यक्षा कांचनताई जगताप, अँड. सोमनाथ घोटेकर, नारायण मुठाळ, अमर ठोंबरे, अनिल गोसावी तसेच पालखी मानकरी बाळकृष्ण महाराज डावरे, जयंत महाराज गोसावी, मोहन महाराज बेलापूरकर उपस्थित होते.

पालखी सोहळ्यानिमित्त राहुरी नगर परिषदेच्या वतीने , प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरातील डॉक्टर संघटनेच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच शहरातील भजनी मंडळांनी मोफत दाढी-कटिंग, चप्पल दुरुस्ती, मसाला दूध, आमटी-भाकरीचे भोजन तसेच विविध प्रकारच्या नाश्त्याची व्यवस्था केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने राहुरीचे पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद ढाकणे, अदिनाथ पाखरे, हनुमंत आव्हाड, अशोक शिंदे तसेच महिला पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

६१ उपदिंड्या; यंदा वारकऱ्यांची संख्या तिपटीने वाढली दिंडीचा नगर जिल्ह्यात आठ दिवसाचा मुक्काम असून यंदाच्या पालखी सोहळ्यात ६१ उपदिंड्या सहभागी झाल्या असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांचा सहभाग सुमारे तिपटीने वाढल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांनी दिली. यंदा पावसामुळे समाधानाचे वातावरण आहे. वारकऱ्यांचा सहभाग अभूतपूर्व आहे. पंढरीच्या वाटेवर जाताना पांडुरंगाकडे भरपूर पाऊस पडावा, बळीराजा सुखी व्हावा, अशी प्रार्थना करणार आहोत. शासन, पोलिस आणि आरोग्य विभागाने दिंडीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत,” अशी भावना निवृत्तीनाथ संस्थानचे विश्वस्त व माजी पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *