भरसभेत दोन मंत्र्यांसमोर शिंदेंच्या आमदाराला रडू कोसळलं!:आमदारकी असूनही कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवू? निधी वाटपावरून महायुतीत भडका
नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधी वाटपातील दुजाभावावर बोलताना विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना चक्क व्यासपीठावरच रडू कोसळले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रघुवंशी यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘आम्ही…