सचिव रणजित सिंह देओल यांची जातेगाव प्रशालेला भेट
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी गुरुवारी जातेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी केली. भेटीदरम्यान देओल यांनी शाळेतील ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स लॅब’ला विशेष भेट दिली. तेथे विज्ञान शिक्षक धनराज चव्हाण आणि विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांचे प्रात्यक्षिक…