![]()
राजराजेश्वर नगरीतील पेशवेकालीन प्रथम मानाच्या श्री बाराभाई गणपतीच्या गणेशोत्सवाला यंदा डिजिटल सर्जनशीलतेची जोड मिळणार आहे. गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता उत्सवातून सामाजिक संदेश, पर्यावरण संवर्धन, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक सलोखा यांचा जागर व्ह
.
श्री बाराभाई गणपतीला अकोल्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत विशेष स्थान आहे. पेशवेकालीन श्री बाराभाई गणपती १८९० पूर्वीपासून आहे. स्थापना कै. भगवाननाथ इंगळे यांनी केली असून, आज पाचवी पिढी समर्थपणे वारसा चालवत आहे. या ऐतिहासिक वारशाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘राजराजेश्वर नगरीतील पेशवेकालीन बाप्पा’ हा स्पर्धेतील महत्त्वाचा विषय ठेवण्यात आला आहे. या अभिनव रील स्पर्धेच्या माध्यमातून गणेशोत्सवातील भक्ती, संस्कृती, सामाजिक संदेश, पर्यावरण संवर्धन आणि सर्जनशीलतेला डिजिटल व्यासपीठ मिळणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जेन-झीलाही डिजिटल व्यासपीठ उपस्थित होणार आहे. रील श्री बाराभाई गणपती संदर्भात असली पाहिजे. स्पर्धेसाठी सादर करण्यात येणारी रील ३० ते ६० सेकंदांची असावी, रीलचा विषय गणेशोत्सव, गणेशभक्ती, संस्कृती, सामाजिक संदेश किंवा पर्यावरण संवर्धनाशी संबंधित असावा, रील स्वतः तयार केलेली व मौलिक असणे आवश्यक आहे. एका सहभागी व्यक्तीला/गटाला फक्त एकच रील स्पर्धेसाठी सादर करता येईल. रील इनस्टाग्रामवरील पब्लिक अकाउंटवर पोस्ट करणे आवश्यक राहणार आहे. रीलमध्ये आयोजक मंडळाने दिलेला अधिकृत हॅशटॅग वापरणे आवश्यक राहणार आहे.
असे होता येणार सहभागी स्पर्धकांनी राजराजेश्वर नगरीतील पेशवेकालीन बाप्पा- श्री बाराभाई गणपतीचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि वैशिष्ट्ये. पर्यावरण संवर्धन, शाडू मातीच्या मूर्ती, निर्माल्य व्यवस्थापन, स्वच्छता. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, सामाजिक बांधिलकी अन्य सामाजिक उपक्रम.गणेशोत्सवातील पारंपरिक प्रथा, संस्कृती, कला आणि ऐतिहासिक परंपरांचे जतन. सर्व समाजांना एकत्र आणणारा गणेशोत्सव, सामाजिक ऐक्य, बंधुभाव व सलोख्याचा संदेश यावर रिल बनवायची आहे.
३० ते ६० सेकंदांत कल्पकतेची कसोटी; समाजासमोर येण्याची संधी स्पर्धकांना ३० ते ६० सेकंदांची रील तयार करावी लागणार आहे. गणेशोत्सवातील श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक विचार नव्या पिढीच्या सर्जनशील नजरेतून समाजासमोर येण्याची संधी या स्पर्धेमुळे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ रील तयार करण्यापुरती मर्यादित न राहता ‘डिजिटल माध्यमातून संस्कृती आणि सामाजिक जाणीवेचा जागर’ ठरणार आहे.