![]()
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी गुरुवारी जातेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी केली. भेटीदरम्यान देओल यांनी शाळेतील ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स लॅब’ला विशेष भेट दिली. तेथे विज्ञान शिक्षक धनराज चव्हाण आणि विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांचे प्रात्यक्षिक दाखवले. सचिवांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत वजन-वस्तुमानातील फरक, मेंदूची रचना, रोबोटिक मॉडेल्स आणि आवर्तसारणी यावर विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिली. विद्यार्थ्यांचे हे ज्ञान पाहून त्यांनी कौतुकाची थाप दिली. त्याचप्रमाणे त्यांनी शाळेतील कलादालन, परसबाग, ॲस्ट्रॉनॉमी लॅब, स्पोर्ट्स क्लब, बहुविध कौशल्य लॅब आणि घनवन उपक्रमांची बारकाईने पाहणी केली. पालकांनी मांडलेल्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी पुण्याचे शिक्षण उपसंचालक एकनाथ अंबोकर, शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे, गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर, केंद्रप्रमुख सुनील चिपाटे आणि माजी प्राचार्य डी. पी. जाधव यांची उपस्थिती होती.
Source link
सचिव रणजित सिंह देओल यांची जातेगाव प्रशालेला भेट