![]()
जायखेडा पोलिस ठाणे हद्दीत अवैध गावठी दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मळगाव-भामेर शिवारातील वाघाड नाल्याच्या काठावर पहाटेच्या सुमारास कारवाई केली. यात गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करून ६७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
.
या ठिकाणी देविदास तुकाराम ठाकर (रा. मळगाव-भामेर, ता. सटाणा) हा गावठी हातभट्टीची दारू तयार होता. त्याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
^आपल्या परिसरात किंवा गावात गावठी दारू अथवा विदेशी मद्याची विक्री होत असल्यास जायखेडा पोलिस स्टेशन किंवा नामपूर आै ट पोस्ट येथे तक्रार करावी. माहिती मिळताच संबंधितांवर कारवाई केली जाईल. – सागर काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, जायखेडा ठाणे