![]()
शहरातील रामगिरीनगर आणि तालुक्यातील खंडाळा येथे दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आल्या. मूलचंद प्रभुदेवा पारीक (४२, रा. रामगिरीनगर, वैजापूर) आणि मयुरी योगेश बागुल (१६, रा. खंडाळा) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मूलचंद पारीक हे काही दिवसांपूर्वी राजस्थान येथून वैजापूर येथे आले होते. शुक्रवारी त्यांनी राहत्या घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, खंडाळा येथील मयुरी बागुल हिनेही शुक्रवारी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली. रात्री उशिरापर्यंत वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात तिच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. दोन्ही आत्महत्यांमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही घटनाप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. दोन्ही घटनांमध्ये आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. त्याअनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत.
Source link
आत्महत्या:वैजापूर शहरासह खंडाळ्यामध्ये दोघांची गळफास घेत आत्महत्या