Headlines

चिंचोली लिंबाजीत एकाच कुटुंबातील लहान बहीण-भावाचा संशयास्पद मृत्यू:फॉरेन्सिक, अन्न-औषध प्रशासनाकडून घरातील अन्नाचे नमुने जप्त




तालुक्यातील चिंचोली लिंबाजीत लहान बहीण-भावाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. अवघ्या दोन वर्षांचा लहानगा आयुष नारायण थोटे याचा गुरुवारी उपचारासाठी जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला, तर त्याची सात वर्षांची बहीण गायत्री नारायण थोटे हिची शुक्रवारी सकाळी प्राणज्योत मालवली. एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी नारायण साहेबराव थोटे (३५) आणि त्यांची पत्नी दैवशाला थोटे हे चिंचोली लिंबाजी येथे राहतात. मंगळवारी रात्री नारायण थोटे, पत्नी दैवशाला, मुलगा आयुष आणि मुलगी गायत्री या चौघांनी एकत्र जेवण केले. मात्र, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास या चौघांनाही उलट्यांचा त्रास सुरू झाला. गुरुवारी हे कुटुंब गावातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. तिथे प्राथमिक उपचार करून हे कुटुंब पुढील उपचारासाठी सिल्लोडकडे निघाले. परंतु, भराडीजवळ आयुषचा मृत्यू झाला. त्यानंतर गायत्री हिला संभाजीनगरला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शुक्रवारी तिची प्राणज्योत मालवली. फॉरेन्सिक, आरोग्य यंत्रणांकडून घटनास्थळी पाहणी घटनेचे गांभीर्य ओळखून पिशोर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, उपनिरीक्षक गवळी, पोलिस पाटील निलेश बलसाने, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक फरीद सिद्दीकी, फॉरेन्सिक लॅबचे आदेश तुवर, सय्यद यासिर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळंके यांनी थोटे यांच्या घरी भेट दिली. पोलिसांनी घरातील तांदूळ, मसाले, पीठ आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. पिशोर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण समोर येणार आहे. अहवाल लवकर मिळेल ^चिंचोलीलिंबाजी येथील नारायण थोटे यांच्या घरातील स्वयंपाकासाठी वापरलेले हळद, तिखट, तांदूळ व पिठाचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. लवकरच त्याचा अहवाल प्राप्त सादर करण्यात येणार आहे. – आदेश तुवर , सहाय्यक रासायनिक विश्लेषक सर्व बाजूंनी तपास सुरू ^प्राथमिक माहितीनुसार आई-वडिलांनी खिचडी खाल्ली होती व मुलांनी खाल्ली नव्हती असे नारायण थोटे यांनी सांगितले. त्यामुळे सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मुलगा आयुषचे पोस्टमार्टम झाले नव्हते, परंतु मुलगी गायत्रीचे पोस्टमार्टम संभाजीनगर येथे केले आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. – कुणाल सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पिशोर स्थिर वाटल्याने उपचारास सिल्लोडला पाठवले ^थोटे कुटुंब ९ तारखेला दुपारी माझ्याकडे आले होते. चौघांनाही ८ तारखेच्या रात्रीपासून उलट्या होत असल्याने अशक्तपणा होता. मी सलाईन आणि इंजेक्शन दिले. त्यांनी खिचडी व केक खाल्ल्याचे सांगितले होते. स्थिर वाटल्यावर ते उपचारासाठी सिल्लोडला गेले. – डॉ. कैलास साबळे, चिंचोली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *