![]()
शिवसृष्टी उभारण्यासाठी चांदवड बाजारतळ परिसरातील दुकाने हटविण्याची कारवाई प्रस्तावित असताना व्यावसायिकांच्या पुनर्वसनाची पर्यायी व्यवस्था अद्याप झालेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात कर्ज व उसनवारी करून दुकानांमध्ये माल भरलेल्या छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुकाने हटविण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था किंवा पुनर्वसन करावे, या मागणीसाठी व्यावसायिकांनी बुधवारपासून (दि. ९) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बाजारतळाच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ‘शिवसृष्टी’ उभारण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने काही व्यावसायिकांना दुकाने हटविण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीही येथील व्यावसायिकांचे विस्थापन झाले होते. त्यावेळी अल्प भाड्यात पेटी शॉप देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याची अद्याप पूर्तता झालेली नसल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला. { उर्वरित पान. ३
Source link
पुनर्वसनाशिवाय दुकाने हटविण्याला विरोध:चांदवड बाजारतळातील व्यावसायिकांचे उपोषण