Headlines

लोखंडी अँगल, पत्रा लागून 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू:शेंद्रा एमआयडीसीतील घटना: तिघांविरुद्ध गुन्हा‎




शेंद्रा एमआयडीसीतील ‘युनायटेड जेनेटिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत काम करताना लोखंडी अँगल व पत्रा डोक्याला आणि चेहऱ्याला लागून गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. अनिकेत गौतम सोनवणे (१९, रा. अहिल्यानगर; हल्ली रा. चिकलठाणा) असे मृत कामगाराचे नाव आहे. कंपनी प्रशासनाने सुरक्षेची कोणतीही साधनसामग्री न पुरविल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करत करमाड पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मृत अनिकेतचा भाऊ अविनाश सोनवणे याच्या फिर्यादीवरून करमाड पोलिसांनी कंपनी व्यवस्थापक प्रशांत खाडे, एचआर अधिकारी राजेंद्र आवटे आणि कंत्राटदार विलास गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत लिफ्टजवळ काम करत असताना अचानक बाहेर आलेला लोखंडी अँगल आणि पत्रा त्याच्या डोक्यावर अन् चेहऱ्यावर जोराने आदळला. कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या आस्थापनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाड पोलिस तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *