Headlines

पळशी‎:तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जोगेश्वरी हायस्कूलचा विजय




जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शासकीय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत पळशी येथील जोगेश्वरी हायस्कूलच्या अंडर-१७ मुलांचा आणि अंडर-१९ मुलींच्या संघाने दिमाखदार विजय मिळवत तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले. संपूर्ण तालुक्यातील विविध शालेय संघांना मात देत दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत जिद्द, चिकाटी, उत्तम सांघिक समन्वय आणि अचूक डावपेचांच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व राखले. अंतिम सामन्यातही दमदार कामगिरी करत अंडर-१७ मुलांचा आणि अंडर-१९ मुलींचा संघ विजयी ठरला असून, या शानदार कामगिरीमुळे दोन्ही संघांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला या यशामुळे मोठी प्रेरणा मिळाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल फोस्टर डेव्हलपमेंट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष द्वारका पाथ्रीकर, जोगेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक तावरे, क्रीडा शिक्षक सपकाळ, बडक, गायकवाड व सर्व विजयी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *