Headlines

मुकुंदवाडी चौकातील मुख्य रस्त्यावर भरदिवसा तरुणाची लूट:व्हिडिओ व्हायरल, वर्दळीच्या चौकात घडलेल्या घटनेनंतरही गुन्हा नाही, कायदा-सुव्यवस्थेवर मात्र प्रश्नचिन्ह


शहरातील वर्दळीच्या मुकुंदवाडी चौकात एका तरुणाला भरदिवसा मारहाण करत लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, भररस्त्यात एवढी गंभीर घटना घडूनही पोलिसांत कोणताह

.

शहरातील मुकुंदवाडी चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. याच चौकात एकाने एका तरुणाला रस्त्याच्या कडेला खाली पाडून मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला. व्हायरल होत असलेल्या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसते की, हल्लेखोर तरुणाशी झटापट करत आहे. तरुण जमिनीवर पडलेला असतानाही तो त्याचे खिसे आणि बॅग तपासण्याचा प्रयत्न करत होता.

रस्त्यावरून जाणारी वाहने आणि लोक हा प्रकार पाहत होते. सुदैवाने, तेथे उपस्थित असलेल्या काही जागरूक नागरिकांनी धाव घेत हल्लेखोराला रोखले. त्यामुळे त्या घाबरलेल्या तरुणाची सुटका झाली. मात्र, भररस्त्यात अशा प्रकाराने कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१-२ या सुरुवातीच्या दृश्यांमध्ये रस्त्याच्या कडेला एक तरुण खाली पडलेला दिसत आहे आणि चौकडीचा शर्ट घातलेला गुंड त्याच्यावर जोरजबरदस्ती करत आहे. हा गुंड तरुणाचा हात पिरगाळताना आणि त्याला उठू न देता बेदम मारहाण करताना स्पष्टपणे दिसून येतो, ज्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात येते.

३ या दृश्यामध्ये गुंड तरुणाच्या अंगावर जातो आणि त्याच्या खिशातील मौल्यवान वस्तू, पाठीला अडकवलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतो.

४ या दृश्यांमध्ये सुदैवाने मदतीसाठी धावून आलेले पांढरा शर्ट घातलेले दोन जागरूक नागरिक दिसतात. या नागरिकांनी वेळीच मध्यस्थी करून हल्लेखोराला बाजूला केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *