![]()
नांदेड शहर पुन्हा एकदा थरारक हत्याकांडाने हादरलेआहे. पुतणीच्या प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादाचाशेवट थेट खुनात झाला. सांगवीजवळील आसना पूलपरिसरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत सचिनयशवंत काळे (२४, रा. नुरी चौक, नांदेड) या युवकाचीविनादांड्याच्या कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्याकरण्यात आली. या प्रकरणातीलमुख्य आरोपी राजेश दत्ता राजेगोरेयाच्यासह त्याच्या तीन साथीदारांनाविमानतळ पोलिस आणि स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाने सहा तासांतताब्यात घेतले. पोलिसांनी तत्परतेचेदर्शन घडविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत सचिन काळे याची अल्पवयीन पुतणी आणिअर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील राजेश दत्ताराजेगोरे (२२) यांच्यात प्रेमसंबंध होते. या दोघांनी काहीमहिन्यांपूर्वी घरातून पलायन केले होते. त्यानंतर भाग्यनगरपोलिस ठाण्यात युवती बेपत्ता झाल्याची नोंद करण्यातआली होती. मात्र युवतीने स्वतःहून पोलिस ठाण्यातहजर होऊन आपण स्वेच्छेने गेल्याचे सांगितले होते.समुपदेशनानंतर ती पुन्हा कुटुंबीयांकडे राहू लागली. याघटनेनंतर सचिन काळे आणि राजेश राजेगोरे यांच्यातसातत्याने वाद सुरू होता.दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीआरोपीने सचिन काळे याचा कुऱ्हाडीने खूनकेला.आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. सहा तासांत ताब्यात प्रेमप्रकरणावरून प्रेयसीच्या काकाचाकुऱ्हाडीचे घाव घालून खूनकरणाऱ्या मुख्य आरोपी राजेश दत्ताराजेगोरे याच्यासह त्याचे मित्रबालाजी राजेगोरे (२१), आत्मारामकदम (२०) आणि आणखी एक,अशा चौघांना विमानतळ पोलिस वस्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअवघ्या सहा तासांत ताब्यात घेतले. बिनादांड्याच्या कुऱ्हाडीने केले वार प्रेमप्रकरणाचा सुरू असलेला वादकायमचा मिटवण्यासाठी एकत्रआलेल्या आरोपी व त्याच्या मित्रांनीसचिन काळे याच्यावर कुऱ्हाडीनेवार केले. ही कुऱ्हाड त्यांनीबिनदांड्याची आणली होती.खिशात लपवून आणलेली कुऱ्हाडहातात धरून त्यांनी सचिनच्यामानेवर, डोक्यावर, तोंडावर गंभीरवार केले. यात सचिनचा मृत्यू झाला. महिनाभरापूर्वीच दोघे गेले होते पळून मृत काळे यांची अल्पवयीन पुतणी वआरोपी राजेश राजेगोरे यांच्यात प्रेमहोते. यातून त्या दोघांनी जून २०२६मध्ये पलायन केले होते. या प्रकरणीभाग्यनगर पोलिस ठाण्यात युवतीहरवल्याची नोंद करण्यात आलीहोती. मात्र अवघ्या २४ तासांतच तीपरत आली होती. मी मामाच्या गावीगेले होते, असे तिने सांगितले होते. प्रकरण मिटवण्यास बोलवून केला घात महिनाभरापासून आरोपी राजेशराजेगोरे आणि मृत सचिन काळेयांच्यामध्ये वाद सुरू होता. हे प्रकरणएकदाचे मिटवून टाकू. काय व्हायचंते होऊ दे. असे म्हणून आरोपी राजेशराजेगोरे याने सचिन काळेलासांगवीजवळ असलेल्या आसनाब्रिज येथे बोलावले होते. याचठिकाणी झालेल्या वादातून राजेशनेमित्रांसोबत सचिनचा खून केला.
Source link
प्रेमप्रकरणातून वाद:प्रेयसीच्या चुलत्याची कुऱ्हाडीने हत्या; प्रियकरासह चार अटकेत, नांदेड शहरातील आसना पूल परिसरात मध्यरात्री खून