Headlines

पुणे शहरातून एकाच वेळी दहा गुंड तडीपार:पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांचे आदेश; गुंडांवर गावठी दारू विक्री, जुगार आणि इतर गंभीर गुन्हे

पुणे शहर आणि जिल्ह्यातून गंभीर गुन्हे करणाऱ्या दहा गुंडांना तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिले आहेत. गावठी दारू विक्री, जुगार आणि इतर गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये अभिजित संजय जाधव (वय २९), साईनाथ विठ्ठल पाटोळे (वय २७), अविनाश मुरलीधर मेटे (वय ३६), गगन तानाजी शिंदे (वय २४), संकेत अमोल…

Read More

रेस्क्यू फाउंडेशनमधून 12 बांगलादेशी महिला पळाल्या:केअरटेकर महिलेला मारहाण करून हातपाय बांधून पलायन, 20 दिवसांनीही शोध नाही

पुण्यातील मोहम्मदवाडी येथील ससाणे वस्तीमधील रेस्क्यू फाउंडेशनमधून १२ बांगलादेशी महिला पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ मार्च रोजी पहाटे ही घटना घडली असून, केअरटेकर महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत या महिलांनी पलायन केले. विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल २० दिवस दडपून ठेवण्यात आला होता. पळून गेलेल्या १२ महिलांपैकी दोघींना त्याच दिवशी सय्यदनगर…

Read More

आशा भोसलेंची शेवटची इच्छा कोणती होती?:आशाताईंचा जुना व्हिडिओ व्हायरल, पांढऱ्या साड्या नेसण्यामागचा किस्साही सांगितला

भारतीय संगीत क्षेत्राचा एक सुवर्णकाळ आज संपुष्टात आला आहे. आपल्या अष्टपैलू आवाजाने तब्बल सहा दशकांहून अधिक काळ श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे, तर जगभरातील संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. आशाताईंच्या निधनानंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड…

Read More

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक:AI चे पोस्टर्स – बॅनर्स चळवळीसाठी धोकादायक, सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केली चिंता

भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. AI च्या माध्यमातून तयार होणारे पोस्टर्स आणि बॅनर्स मोठ्या प्रमाणावर वापरले जात असून, हा प्रकार चळवळीच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जगभरात बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी सुरू असताना AI…

Read More

सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली:लतादीदीनंतर आणखी एक तारा निखळला- CM; संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला – पवार

तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या आशाताईंच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणाले,…

Read More

अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करत बलात्कार:भोंदूबाबाने महिलेची केली ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यात एका भोंदूने दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून एका महिलेवर बलात्कार केला आणि तिची ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. या धक्कादायक घटनेप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका ४२ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read More

आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली:ताई गायक म्हणून अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही ग्रेट होत्या -अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आशाताईंच्या आठवणी जागवत त्यांची नांदेडला येण्याची इच्छा अपूर्णच राहिल्याची भावना व्यक्त केली आहे. आशाताई गायक म्हणून अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही त्या ग्रेट होत्या, असे ते म्हणालेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले….

Read More

विवाह मोडल्याने तरुणीचा खून:आरोपीला जन्मठेप, पुणे सत्र न्यायालयाचा निकाल; २० हजार रुपये दंडही ठोठावला

विवाह मोडल्याच्या कारणावरून एका तरुणीवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी हा निकाल दिला. शरीफ रज्जाक शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. २०१८ मध्ये शेख याचा नाझनीन सादिक शेख (वय १८, रा. गणेश…

Read More

राऊतांनी पाकिस्तानची चाटुगिरी थांबवावी:अफजल खानाच्या दाढ्या कुरवळणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये– नवनाथ बन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काय आहे हे भारतामधील लोकांना माहिती आहे.संजय राऊत तुम्ही पाकिस्तानची चाटुगिरी करू नका, त्यांची प्रवक्तेगिरी करू नका. पाकिस्तानचे उदो उदो करण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, पाकिस्तानने इराण-अमेरिकेमध्ये दलाली करण्याचे काम केले आहे. हे करण्यापेक्षा तिथल्या समस्याकडे जर त्यांनी…

Read More

बारामती पोटनिवडणुकीचे रणशिंग फुंकले!:सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा कन्हेरीतून प्रारंभ, अजितदादांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक होत सुरुवात

बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार यांनी कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन घेत तसेच अजित पवारांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक होत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. कन्हेरी मारुती मंदिराच्या समोरच पक्षाची सभा पार पडत आहे. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, सुनील शेळके,…

Read More