फडणवीसांना शिकारीचा छंद, शिकार टप्प्यात आली की बार उडवतात:CDR थेट व्हॉटसॲपवर येतोच कसा? गृहखात्याच्या मदतीशिवाय हे अशक्य- संजय राऊत
खरात बाबाचे प्रकरण साधे नसून त्याला मोठा राजकीय ॲंगल आहे. पोलिसांनी खरातकडून वधवून घेतलेली विधाने अत्यंत महत्त्वाची आहेत. कॉल डिटेल्स (CDR) सारखी अत्यंत गोपनीय माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या मदतीने बाहेर आली असून, कोणत्या नेत्याचे खरातशी किती वेळ बोलणे झाले, हे जाणीवपूर्वक प्रसिद्ध केले जात आहे, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे….