![]()
सोलापूर शहर व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित साडेचार हजार शाळांमध्ये शनिवार (दि.११) पासून पटपडताळणी व संकलित मूल्यमापन परीक्षा एकाच वेळी सुरू झाली. या प्रक्रियेत आतापर्यंत शहरातील ३०९ शाळांपैकी १२० शाळांची प्रत्यक्ष पटपडताळणी झाली. तर, जिल्हा परिषदेच्या २७७३ पैकी ४२९ शाळांची पटपडताळणी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. या मोहिमेसाठी महापालिकेद्वारे ४४ कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही स्तरांवरील शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद घेत आहेत. १२० शाळांचा अहवाल प्राप्त झाला असून, उर्वरित शाळांची माहिती ऑनलाइन भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोहोळ| मोहोळ तालुक्यामध्ये पंचायत समिती गटशिक्षण विभागामार्फत शनिवारी पट पडताळणीसाठी ३४ जणांचे पथक नियुक्त केले होते. दरम्यान ६३ शाळांमध्ये पटपडताळणी करण्यात आली. सर्व शाळांमधील वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह पालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. तालुक्यातील १९३ शाळांची पटपडताळणी तीन टप्प्यात होईल. मंगळवेढा । तालुक्यातील पहिली ते नववी व अकरावी पर्यंतच्या शाळांची शिक्षण विभागाच्या वतीने पटपडताळणी सुरु झाली. शनिवारी साधारण ३८ शाळांची पट पडताळणी झाली असून एकूण १५१ शाळांची केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा २१, खासगी प्राथमिक ३, खासगी माध्यमिक १३, ज्युनिअर कॉलेज २ असे ३८ संस्थांची पट पडताळणी केली. काटेकोर पद्धतीने केली जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांनी सांगितले. मंगळवेढ्यात ३८ शाळांत पडताळणी
Source link
पहिल्या टप्प्यात 429 शाळांची पटपडताळणी,:'आधार''मुळे बोगस पटसंख्येला बसणार चाप; अकरा तालुक्यात पथकांची नियुक्ती