![]()
सारसनगर येथील दामोदर विधाते मास्तर विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये महात्मा फुले यांच्या कार्याचा, विचारांचा व समाजप्रबोधनाच्या संदेशाचा जागर करण्यात आला. कार्यक्र
.
नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देत शिक्षणाची क्रांती घडवून आणली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला तसेच समाजाला नवदिशा दिली. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. समाजात समानता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहनत्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
प्रा. विधाते म्हणाले, महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक तर होतेच त्याचबरोबर तर ते विचारवंत आणि क्रांतिकारक होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना उभारी दिली. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा फुले यांच्या जीवनातून घ्यावी. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हेच खरे अभिवादन त्यांना ठरणार असल्याचेविधाते यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल मेहेत्रे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांना क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या कार्याचा परिचय करून दिला. पाहुण्यांचा परिचय निता जावळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश दरवडे यांनी केले, तर आभार राधाकिसन क्षीरसागर यांनी मानले. यावेळी दामोदर विधाते विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.