आज लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित विधेयक:जितेंद्र सिंह सादर करतील, NDA ची बाजू 9 खासदार मांडतील; 2024 चा कायदा बदलेल
आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित करतील. तर, सरकार आज पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी ‘सार्वजनिक परीक्षा (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ सादर करेल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह लोकसभेत हे विधेयक सादर करतील. एनडीएच्या वतीने भाजप, टीडीपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अपना दल, एलजेपी (रामविलास) आणि जेडीयूचे एकूण 9…