दिल्लीसह महाराष्ट्रात पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राज्य आणि केंद्र सरकार अत्यंत संवेदनशील व सकारात्मक असून येत्या १ ते २ दिवसांत केंद्र सरकारकडून याप्रकरणी मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असा दावा एकनाथ शिंदेंच्या शि
.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना लोकशाहीत मुंबईत मोर्चा काढण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु, सरकारनेही या आंदोलनाला अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे, त्यांना सहकार्याची भूमिका दाखवणे आणि चर्चेसाठी निमंत्रण देणे ही पावले सरकारने उचलली आहेत.”
धर्मेंद्र प्रधानांबाबतचा निर्णय पंतप्रधानांचा अधिकार
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा की नाही, हा सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अधिकार आहे. मात्र, येत्या १ ते २ दिवसांत केंद्र सरकार या कोंडीवर मोठा आणि मार्ग काढणारा निर्णय घेईल. संसद अधिवेशनात ‘पेपरफुटी’विरोधात अत्यंत कठोर कायदा आणून विद्यार्थ्यांना दिलासा दिला जाईल.”
आंदोलनात समाजकंटकांची घुसखोरी
आंदोलनातील हिंसक घटना आणि पोलिसांवर लागलेल्या आरोपांवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “दादर किंवा इतर भागांतील आंदोलनादरम्यान काही बोगस लोक, ज्यांच्या छातीवर बिल्ला नाही किंवा ओळख नाही, ते काठ्या घेऊन आंदोलनात घुसताना दिसले आहेत. आंदोलन भडकवणे आणि लाठीचार्ज घडवून आणणे यासाठी काही समाजकंटक ही कृत्य करत आहेत. त्यामुळे उद्याच्या मोर्च्याबाबत राज ठाकरेंनी अशा उपद्रवींना धडा शिकवण्याची जी भूमिका घेतली आहे, ती योग्यच आहे.”
पोलिसावर तातडीने कारवाई
संजय शिरसाट म्हणाले, “टॅक्सीतील तरुणाला ५० ग्रॅमची पावडर टाकून आत टाकण्याची धमकी देणाऱ्या सायन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने निलंबित केले आहे. या आंदोलनाकडे सरकार कोणत्याही राजकीय अँगलने पाहत नसून पूर्णपणे सहानुभूतीने पाहत आहे.”
संजय राऊत मूर्खासारखे बोलतात; त्यांचा हा धंदाच झालाय
पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले होते आणि रात्री १२ वाजता माध्यमांवर आले, या खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा शिरसाट यांनी अत्यंत कठोर शब्दांत समाचार घेतला. “संजय राऊत मूर्खासारखे बोलत आहेत. देशाचे पंतप्रधान रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत भयभीत होते हे पाहायला राऊत काय त्यांच्या पायाशी बसले होते का? की काय जादूटोणा करत होते? कोणतीही पायाभूत माहिती नसताना काहीही विधाने करणे हा राऊत यांचा धंदाच झाला आहे आणि त्यांच्या विधानांना आता कोणीही गांभीर्याने घेत नाही,” असे संजय शिरसाट म्हणाले.
“सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण का सोडले, असा सवाल करणाऱ्या राऊतांनी आधी स्वतः ४ दिवस उपोषणाला बसून पाहावे, म्हणजे उपोषणाची झळ काय असते ते कळेल. समोरच्याने उपोषण कधी सोडावे हा त्याचा व्यक्तिगत निर्णय असतो,” असे संजय शिरसाट म्हणाले.
जखमी विद्यार्थ्यांना सरकारी मदत
सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वतः भेट घेऊन सकारात्मक चर्चा केल्यानंतर आणि तोडगा निघाल्यानंतरच वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले आहे. हिंसाचार आणि दगडफेकीसारख्या घटना टाळण्यासाठी हा योग्य निर्णय होता.”
“आंदोलनादरम्यान जखमी झालेले सर्व विद्यार्थी आपलेच आहेत. त्यांच्या सर्व वैद्यकीय उपचारांचा आणि हॉस्पिटलचा खर्च सरकार स्वतः करेल,” अशी घोषणा शिरसाट यांनी केली.
शरद पवार – मोदी भेटीवर प्रतिक्रिया
शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याच्या चर्चेवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवार एनडीएसोबत जातील की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, सध्याच्या आंदोलनामुळे काही अडथळे निर्माण झाले असावेत. पुढील आठवड्यात या राजकीय घडामोडींचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
हे ही वाचा…
राज ठाकरेंचा संतप्त सवाल:विद्यार्थ्याला मारल्यावर शिक्षकांवर कारवाई होते; मग लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर, आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही?

नीट परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर, सरकारवर आणि न्यायव्यवस्थेवरही सडकून टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
एखाद्याने आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते!:नीट पेपरफुटीवरून मंत्री चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य, मनसेची टीका- 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू आंबा चोरल्यासारखं वाटतोय?

‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकारण तापले आहे. यातच आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (24 जुलै) एका पत्रकार परिषदेत बोलताना केलेल्या एका अजब वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “एखाद्याने आंबा चोरला, म्हणून त्याची शिक्षा फाशी असू शकत नाही,” असा युक्तिवाद त्यांनी पेपरफुटी प्रकरणावर बोलताना केला. या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
माजी गृहमंत्र्याकडूनच महिला पोलिसाचा विनयभंग!:भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, व्हिडिओवरून नवा वाद

मुंबईत सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलनांदरम्यान विनयभंगाच्या आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला दादरमधील ‘सीजेपी’ (CJP) आंदोलनादरम्यान साध्या वेशातील पोलिसाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपने थेट माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्यावरच एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या दोन्ही घटनांमुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सविस्तर वाचा…