Headlines

Congress proposes merger with NCP’s Sharad Pawar faction by August 15, Lok Sabha MP Kalyan Banerjee gives Mamata an ultimatum


  • Marathi News
  • National
  • Congress Proposes Merger With NCP’s Sharad Pawar Faction By August 15, Lok Sabha MP Kalyan Banerjee Gives Mamata An Ultimatum

नवी दिल्ली/कोलकाता20 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाला १५ ऑगस्टपर्यंत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याआधी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही विलीनीकरणाचा सल्ला दिला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा सल्ला चांगला आहे. परंतु आता हे सगळे कधी होईल, कसे होईल ते येणारा काळच सांगेल.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बारिक यांनी वरिष्ठ सभागृहाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, लोकसभेतील ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जींनी ममतांना पुतण्या अभिषेक व स्वतः यांच्यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले.

शत्रुघ्न म्हणाले-ममतांची साथ सोडणार नाही

दुसरीकडे, शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियो आणि सौगत रॉय यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी सार्वजनिकपणे पक्षप्रमुख ममता बॅनर्जींवरील पाठिंबा पुन्हा व्यक्त केला आहे. आसनसोलचे तृणमूल खासदार शत्रुघ्न सिन्हा एका मुलाखतीत म्हणाले, कठीण काळात मी ममतांची साथ सोडणार नाही. मी अडचणीत असताना ममता माझ्या पाठीशी उभ्या होत्या. काही लोकांनी बळजबरी, भीती किंवा काही लालसा असल्याने बॅनर्जी यांची साथ सोडली असू शकते. परंतु माझे एक तत्त्व आहे. आपण ना पक्षाची साथ सोडणार, ना पक्षनेत्यांची. राज्यसभा खासदार बाबुल सुप्रियो यांनीही आपण ममतांच्या गटासोबत असल्याचे स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *